70 Year Old Groom Viral Video : आजकाल सोशल मीडियावर लग्नाचे (Marriage) अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ खास चर्चेत येतात, असाच एक लग्नाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे आणि त्याचं कारणंही तसं खास आहे. ते म्हणजे नवरदेव. 70 वर्षांच्या आजोबांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. इतकंच काय तर या 70 वर्षीय आजोबांच्या लग्नात त्यांची मुलं, नातवंड आणि नातेवाईक बेभान होऊन नाचताना दिसत आहेत.
वयाच्या 70 व्या वर्षी आजोबा बोहल्यावर
एका 70 वर्षांच्या आजोबांचं धूमधडाक्यात लग्न झालं आहे. हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील आहे. बांसवाडा जिल्ह्यातील मेनापादर गावात एका 70 वर्षीय आजोबांनी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. या आजोबाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरदेवाला संपूर्ण गावातील लोकांच्या त्यांच्या खांद्यावर बसवून नाचताना दिसत आहेत. हा विवाह पूर्ण विधीवत आणि थाटामाटात पार पडला.
70 वर्षांच्या आजोबाच्या या लग्नाची सर्वदूर चर्चा
या वृद्ध नवरदेवाचं लग्नच नाही तर हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या अनोख्या लग्नात वृद्ध नवरदेवाचा मुलगा, नातू, सून आणि सर्व ग्रामस्थ वऱ्हाडी झाले होते. लग्नात सर्व विधी पूर्ण रितीरिवाजाने पार पडलं. वृद्धाच्या कुटुंबासह संपूर्ण गावातील लोक आनंदी होते. 70 वर्षांच्या आजोबाच्या या लग्नाची सर्वदूर चर्चा रंगली आहे.
काय आहे यामागचं कारण?
मीडिया रिपोर्टनुसार, या अनोख्या विवाह सोहळ्यामागचं कारण समोर आलं आहे. येथील स्थानिक प्रथेनुसार, सुमारे 55 वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबाने काली देवी याची पत्नी म्हणून निवडली होती. त्यावेळी दोघांनीही आदिवासी पद्धतीने नत्र प्रथेद्वारे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक प्रथेनुसार, विधी करून त्यांनी संसाराला सुरुवात केली. पण, त्यावेळी त्याचं लग्न झालं नव्हतं. त्यामुळे थाटामाटात लग्न करण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती.
वराचं वय 70 तर वधूचं वय 65
त्यांची ही इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मुलांनी पूर्ण केली. 30 मे रोजी 70 वर्षीय गलिया आणि काली खंत यांचा संपूर्ण विधीवत आणि थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या लग्नात त्यांच्या कुटुंबियांसह सर्व गावकरी सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या लग्नामुळे संपूर्ण गावात उत्सवाचं वातावरण होतं. या वराचं वय 70 तर वधूचं वय 65 असणाऱ्या वृद्ध जोडप्याचा गावातील हा पहिलाच विवाह होता.
संपूर्ण गावात उत्सवाचं वातावरण
या वृद्ध जोडप्याच्या या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, सुमारे 55 वर्षांपूर्वी काही कारण आणि परिस्थिती यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. आता वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचा मुलगा, नातवंड आणि संपूर्ण समाजासमोर वाजवत गाजत आदिवासी रितीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला.