Cycling On Over Bridge Top : आज कुछ तुफानी करते हैं... टीव्हीवर तुम्ही आतापर्यंत बरेच ॲक्शन सीन्स पाहिले असतील. अभिनेते एका बिल्डींगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारताना, कधी पाण्यावरून चालताना तर कधी इतर काही ॲक्शन करताना दिसून येतात. पण खऱ्या आयुष्यातही काही लोक असे स्टंट करायला जातात, पण त्यांना आयुष्याची किंमत कळत नाही. असे स्टंट करताना लोक जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थेट फूटओव्हर ब्रिजच्या छतावर सायकल चालवताना दिसत आहे. उपस्थितांनी हा व्हिडीओ चित्रीत केला असून हा प्रचंड चर्चेत आहे.


थेट फूटओव्हर ब्रिजच्या छतावर सायकल घेऊन चढला तरुण


व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भलताच स्टंट करताना दिसत आहे. हा व्यक्ती सायकल घेऊन थेट उंच ओव्हरब्रिजच्या छतावर चढला. काही उपस्थितांच्या नजरेत ही बाब आल्यावर त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फूटओव्हर ब्रिजच्या छतावर एक तरुण सायकल घेऊन चढलेला दिसत आहे. त्यानंतर हा तरुण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पेडलिंग करत सायकल चालवत नेतो. हे थरारक दृश्य पाहून रस्त्यावरून रहदारी करणारे लोकही थांबले. उपस्थितांना त्यांच्या डोळ्यावर विश्चासच बसत नव्हता. व्हिडीओ पाहून तुम्हाला याचा अंदाज येईल.


तुम्हीही पाहा थक्क करणारा व्हायरल व्हिडीओ :






'बहुतेक याला गुगल मॅपने धोका दिला'


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर giedde या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला आहे की, 'हा व्यक्ती ब्रीजच्या छतावर कसा पोहोचला?' दुसऱ्याने लिहिलंय, माँ मेरी शक्तीयों का गलत इस्तेमाल हो रहा है.' आणखी एकाने कमेंट करत म्हटलंय, 'बहुतेक याला गुगल मॅपने धोका दिला आहे'.


जीवघेणं स्टंट करणं महागात पडू शकतं


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तरुण उत्तम समतोल राखत फूटओव्हर ब्रिजच्या घसरत्या छतावरून सायकल चालवताना दिसत आहे. या व्यक्तीच्या धाडसाने लोक चकीत झाले आहेत. पण असे जीवघेणं स्टंट करणं महागात पडू शकतं. दरम्यान, हा तरुण नेमका छतावर चढला कसा आणि उतरला कसा याबाबत व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेलं नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम