एक्स्प्लोर

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

हिंगोली/उस्मानाबाद : तूर विक्रीसाठी गेल्या आठ दिवसांपासून रणरणत्या उन्हात तूर खरेदी केंद्रांबाहेर उभे आहोत. व्यापारी कवडीमोल भावाने तूर घेतायेत, काहीही करा, पण आमची तूर खरेदी करा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे. शेतकऱ्यांनी सर्व तहान-भूक विसरुन 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सरकारी तूर खरेदी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांबाहेर पाच ते सात किमीच्या ट्रॉलीच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. बाजार समित्यांचं सरकारला पत्र महाराष्ट्रात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत. व्यापाऱ्यांकडून तूर तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जाते. सरकारी तूर केंद्रांवर शेतकऱ्यांकडून तुरीला 5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. मात्र सरकारने तूर खरेदी करण्यासाठी ठेवलेली मुदत 22 एप्रिल रोजी संपली. मात्र त्यानंतरही तुरीची आवक सुरुच आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. आज ना उद्या तूर खरेदीचा निर्णय होईल, या आशेने शेतकरी एवढ्या उन्हात रांगेत बसून आहे. बाजारात आणलेली तूर पुन्हा घराकडे नेऊन, निर्णय झाल्यानंतर बाजारात आणणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही, त्यामुळे तूर खरेदीचा निर्णय होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करु, असं आश्वासन देणारं सरकार आपला शब्द पाळतं का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री कृषीमंत्र्यांच्या भेटीला तूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेणार आहेत. तुरीची निर्यातबंदी उठवण्याबाबतीत या भेटीत चर्चा होईल. तुरीवरची निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचा मार्ग सोपा होईल, अशी माहिती सहकार आणि पणण मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. औरंगाबादमध्ये तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्याला चक्कर सरकारने तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका 75 वर्षीय शेतकऱ्याला तूर खरेदी केंद्रावर चक्कर आली. खाली पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. सोनवाडी येथील शेतकरी रंगनाथ आल्हाट मागील आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी पैठण येथील केंद्रावर बसून होते. त्यांना उन्हाचा चटका बसून चक्कर आली. त्यामुळे त्यांचा पाय कंबर आणि मांडी यांच्यामध्ये मोडला आहे. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे. रंगनाथ आल्हाट यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 50 हजार रूपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र तूर विकली तरीही 28 हजार रुपयेच मिळतील, त्यामुळे उपचारासाठी बाकीचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित बातम्या :

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget