Tiger Shroff In Singham 3 : 'सिंघम 3' (Singham 3) या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता तिसऱ्या सिनेमाची ते प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) लूक आऊट झाला आहे. 


अजय देवगन (Ajay Devgn) स्टारर 'सिंघम 3' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासंबंधित प्रत्येक अपडेट ते जाणून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) लूक आऊट झाला होता. आता अजयच्या 'सिंघम 3' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची एन्ट्री झाली आहे. टायगरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सिंघम 3' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


टायगर श्रॉफने शेअर केलं 'सिंघम 3'चं पोस्टर (Tiger Shroff Shared Singham 3 Poster)


बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) 'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'सिंघम 3'ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमात अभिनेता टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. टायगरने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सिंघम 3' या सिनेमातील लूक शेअर करत टायगरने लिहिलं आहे,"ड्यूटीपर एसीपी सत्या रिपोर्टिंग सिंघम सर". 'सिंघम 3'मध्ये टायगरची एन्ट्री झाल्याचा चाहत्यांनाही आनंद झाला आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आपला आनंद व्यक्त करत आहेत. 






टायगर श्रॉफचा 'गणपत' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'सिंघम 3' हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'सोबत (Pushpa 2) या सिनेमाची टक्कर होणार आहे. टायगरचा 'गणपत' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विकास बहल या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमात टायगरसह कृती सेनन आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. टायगरच्या या सिनेमाचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Singham 3 : 'सिंघम 3'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता; 2024 मध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी