एक्स्प्लोर

यावर्षीचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. यामध्ये हे सर्व निर्णय घेण्यात आले.

मुंबई : यावर्षीचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने आणि मान्यता ऑनलाईन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2017-18 च्या हंगाम नियोजन आणि ऊस गाळप आढावा बैठक पार पडली. या बैठकीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांची उपस्थित होती. या गाळप हंगामात अंदाजे 9.02 लाख हेक्टर ऊसाची लागवड असून 722 लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तर 73.4 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या गाळपाच्या तुलनेत 2017-18 मध्ये 94 टक्के वाढ अपेक्षित आहे. या काळात राज्यात 170 कारखाने सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. केंद्र सरकारने यावर्षीच्या गाळप हंगामासाठी 9.50 टक्के उताऱ्यासाठी 2550 रुपये प्रती मेट्रिक टन ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक एक टक्के उताऱ्यासाठी 268 रुपये प्रती मेट्रिक टन दर मिळेल. राज्यातही हाच ‘एफआरपी’ देण्यात येणार आहे. तसेच ज्या साखर कारखान्यांनी शासकीय देण्याचे हप्ते नियमितपणे भरले आहेत आणि दर नियंत्रण समितीचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना ‘एफआरपी’पेक्षा जास्त दर देण्यास लवकरात लवकर मान्यता देण्याचे अधिकार साखर आयुक्तांना देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
  • मार्च 2017 अखेरपर्यंत 90 सहकारी साखर कारखान्यांकडे असलेल्या 6100 कोटी रुपयांच्या मुदत कर्जाच्या पुनर्गठनाबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणे
  • राज्यातील सहकारी कारखान्यांच्या अल्पमुदत कर्ज आणि त्यावरील व्याजाला शासन थकहमी सुरू ठेवणे
  • शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून कोणतीही कपात न करणे
  • भाग विकास निधीसाठी प्रती टन 3 टक्के अथवा जास्तीत जास्त 50 रुपये कपात करणे
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 4 रुपये प्रती टन देणे
  • ऊस पिकासाठी ठिबक सिंचन योजनेत स्वयंचलित ठिबकसाठी अनुदान देण्यासाठी शासन निर्णयात बदल करणे
  • साखर कारखान्यांनी उभारलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या वीज खरेदी कराराबाबत सहकार मंत्री आणि उर्जा मंत्री यांच्या स्तरावर स्वतंत्र बैठक घेण्यात यावी.
परराज्यात ऊस विकण्यास बंदी राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या उसावर बंदी घालण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. ऊस किंमतीवर आयकर आकारणीसंदर्भात तसेच हंगाम 2006-07 आणि 2007-08 मधील प्रलंबित साखर अनुदान आणि 2015-16 मधील उत्पादन अनुदान मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेजारील कर्नाटक राज्याचा ऊस गाळप हंगाम राज्याच्या अगोदर सुरु होता. मात्र कर्नाटकात ऊसाचं उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्राचा ऊस पळवला जातो. त्यामुळे राज्य सरकारने यावर्षी परराज्यात ऊस विकण्यासाठी बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Embed widget