एक्स्प्लोर

Nagpur ZP Scam : 'सोयीं'च्या निर्णयांचीच अंमलबजावणी, गैरव्यवहारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषदेच्या स्थायीच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले जातात. मात्र त्यापैकी प्रशासनाच्या 'सोयीं'च्या निर्णयांचीच अंमलबजावणी करण्यात येते. सत्ताधाऱ्यांचेही प्रशासनावर वचक नसल्याने हा प्रकार घडत आहे.

नागपूरः जिल्हा परिषदेत अनेक गैरव्यवहार सुरु आहेत. यापैकी सुरक्षा ठेव घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने 2014-2015 पासून या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र सहा महिने उटलूनही चौकशी सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका होत आहे. जर स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर फायदा काय? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा उघड झाला होता. कंत्राटदार सुरक्षा ठेव रकमेचा मूळ डीडी काढून घेत त्याऐवजी झेरॉक्स प्रत जोडत होते. त्याच प्रमाणे एकच डीडी अनेक कंत्राट घेताना जोडत असून डीडीची रक्कम मुदतपूर्वीच काढून घेत असल्याचा प्रकार चौकशीत समोर आला. या प्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा, लघु सिंचन व बांधकाम विभागाकडून सदर पोलिस ठाण्यात संबंधित कंत्राटदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर एका प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणात 12 कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेचे 79 लाखांचे नुकसान झाले असून, ही रक्कम दोषी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. परंतु अद्याप रक्कम वसूल झाली नाही. दुसरीकडे चौकशीत 2019-2020, 2020-2021 या दोन वर्षातील कामांची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे वर्ष 2014-2015 पासून या प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा स्थायी समितीत विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी उपस्थित केला होता. तसा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु अद्याप चौकशीच सुरू झाली नाही.

सहा महिन्यापूर्वी शिरुळ येथील ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा गाजला होता. त्या ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केले हे चौकशीत सिद्धही झाले होते. तरी आजपर्यंत त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते आतिश उमरे यांनी दिली. यासोबतच समान निधी वाटपाबाबत अनेकवेळा निर्णय झाला. मात्र, त्याचीही अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

" स्थायी समितीच्या बैठकीत अनेक बाबतीत निर्णय होतात. ठराव करण्यात येतात. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तर अनेक भ्रष्टाचार उघड झाल्यावरही संबंधीतांवर कारवाई करण्यात येत नाही. यात फक्त प्रशासनाच्या 'सोयी'च्या मुद्द्यांची अंमलबजावणी केली जाते. सत्ताधाऱ्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडतो. म्हणून येत्या स्थायी समितीत या मुद्द्यावर जाब विचारण्यात येईल. "
-आतिश उमरे, विरोधी पक्ष नेता, जि.प.


महत्त्वाच्या बातम्या

मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Embed widget