G20 Summit 2023 : भारतामध्ये  जी-20 परिषदेची जोरदार तयारी चालू आहे. 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत जी-20 परिषद पार पडणार आहे. सोबतच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे जी-20 परिषदेकरता दिल्लीत पोहोचले आहेत. जो बायडेन यांच्या सुरक्षेकरता मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी ते राहत असणाऱ्या हाॅटेलपासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर हाॅस्पिटलची व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या ठिकाणाजवळ हॉस्पिटल असणे का आवश्यक आहे? या मागचे कारण नेमके काय हे समजून घेऊयात. 


10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल काय आहे?


आपत्कालीन परिस्थितीकरता 10 मिनिटांच्या अंतरावर राष्ट्राध्यक्षांसाठी हाॅस्पिटल असते. त्या हाॅस्पिटलमध्ये त्यांचे स्वत:चे काही एजंट्स देखील असतात जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांशी बोलून उपचार करता येतील. विशेष म्हणजे संबंधित हाॅस्पिटलमध्ये जो बायडेन यांच्या रक्तगटाचे रक्त देखील जमा करून ठेवण्यात आले आहे. जो बायडेन दिल्लीतील हाॅटेल मौर्य या ठिकाणी मुक्कामी आहेत तर या हाॅटेलच्या जवळपास 400 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. जो बायडेन हे स्वत: 14 व्या मजल्यावर राहत आहेत. 


कशी असणार आहे  जो बायडेन यांची सुरक्षा


जो बायडेन यांच्याकरता मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या सुरक्षेव्यवस्थेत प्रामुख्याने संरक्षण विभागाचे एजंट, गुप्त सेवा एजंट आणि नंतर पोलिस दल. तर भारतात त्यांच्या सुरक्षेकरता एसपीजी कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच दिल्ली पोलिसही त्यांच्या सुरक्षेकरता सोबत असणार आहेत. जेव्हा-जेव्हा राष्ट्रपती विदेश दौऱ्यावर असतात. त्याचे सिक्रेट सर्व्हिस एजंट सुरक्षा तपासण्यासाठी त्याच्या भेटीच्या तीन महिन्यांपूर्वी तेथे भेट देऊ लागतात. 


G20 मध्ये कोणत्या देशांचा समावेश?


G20 मध्ये युरोपियन युनिसह 19 राष्ट्रे आहेत. भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि यूएसचा (अमेरिका) समावेश आहे. 


G20 म्हणजे नेमके काय?


G20 हा 20 देशांचा क्लब आहे. हे देश जागतिक आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात. G20 देशांचा जागतिक आर्थिक उत्‍पादनात 85% आणि जागतिक व्‍यापारात 75% पेक्षा जास्त वाटा आहे. तसेच लोकसंख्येच्या पातळीवर विचार केल्यास जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहेत.


 


इतर महत्वाच्या बातम्या


G20 Summit in Delhi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जी-20 परिषदेसाठी भारतात पोहचले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणार द्विपक्षीय बैठक