नोएडा : प्रेमासाठी पाकिस्तानातून (Pakistani) पळून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत चर्चेत आहे. सचिन आणि सीमाची प्रेमकहाणी (Seema Haider Sachin Love Story) गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाशझोतात आहे. पाकिस्तानी सीमा हैदरने भारतात आल्यावर हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे. सीमा हैदर नित्यनेमाने हिंदू धर्माप्रमाणे देवीदेवतांची पूजा करते आणि ती सर्व हिंदू सणही साजरे करते. आता सीमा हैदर सनातनी बनली आहे. सीमा हैदर आणि सचिन मीनाने सनातनी दीक्षा घेतली आहे. एकीकडे सनातन धर्माच्या मुद्द्यावरून देशभरात वाद सुरु असताना यामध्ये सीमा हैदरनेही उडी घेतली आहे.
पाकिस्तानी सीमा बनली सनातनी
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचे चिरंजीव आणि मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. उदयनिधी स्टालिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. या प्रकरणावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरनेही तिचा पती सचिनसोबत सनातन धर्माची दीक्षा घेतली आहे.
सीमा हैदरने सनातनी दीक्षा घेतली
सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनी सनातनी दीक्षा घेतली आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीमाने भगव्या रंगाची साडी परिधान केली असून ती सनातन धर्माची दीक्षा घेत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सचिन सीमाच्या शेजारी उभा आहे, यावेळी त्यांचे दोन्ही वकीलही तिथे उपस्थित होते. धार्मिक नेते श्री श्री रोहित गोपाल यांच्या उपस्थितीत सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी सनातनी गुरु दीक्षा देण्यात आली. यावेळी हवन आणि पूजाही करण्यात आली. दीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता दोघेही सनातनी झाले असल्याचे धर्मगुरूंनी सांगितले.
सीमा हैदर आणि सचिन मीनाची प्रेमकहाणी
पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची पबजी गेममुळे ऑनलाईन ओळख झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली. या दोघांच्या प्रेमकहाणीची बरीच चर्चा आहे. वर-वर पाहात ही एखादी बॉलिवूडची लव्ह स्टोरी वाटत असली तरी यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीमा हैदर अवैधरित्या घुसखोरी करत भारतात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :