Tharala Tar Mag Latest Episode : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेच्या आगामी भागात काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. महिपत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णार सायलीने केला आहे. या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. 


'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Tharala Tar Mag Todays Episode)


'ठरलं तर मग' या मालिकेच्या सुरुवातीलाच प्रिया घरातील मंडळींसाठी सरबत बनवताना दिसत आहे. त्यावेळी सायली किचनमध्ये जात प्रियाला म्हणते,"हे माझं घर आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत हे मलाच माहिती आहे". दरम्यान पूर्णा आणि अस्मिता बाहेर गप्पा मारत असताना प्रियाचं कौतुक करतात. 
प्रियाचं वागणं अश्विनला मात्र खटकतं. ती कल्पनाला भेटायला जात असताना तो तिला अडवतो.


महिपत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार


महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्धार सायलीने केला आहे. दुसरीकडे बेल झाल्याने प्रताप खूपच आनंदी आहे. महिपतच्या करामती त्याला माहिती नसल्याने त्याने आपल्यावर उपकार केले असल्याचं त्याला वाटतं. दरम्यान सायली प्रियाला म्हणते की,"पूर्णा आजीने देव पाण्यात ठेवले आहेत. तू जर देवाकडे बाबांना सोडवण्याची विनंती केलीस तर तो तुझं नक्की ऐकेल. सायली प्रियाला देवघरात घेऊन येते आणि तिची सर्व नाटकं बंद करण्याचा सल्ला देते. 


सायलीला अर्जुनची साथ


प्रतापला सोडवणाऱ्या महिमतचा सायलीने अपमान केल्या असल्याचं घरातल्यांना वाटतं. प्रत्येक द्वेशाचं मूळ ही मुलगी आहे, मला तुझी लाज वाटते, असं घरातले सायलीला म्हणतात. पण अर्जुन मात्र सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. 'ठरलं तर मग'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन म्हणतो,"कोणी काहीही म्हणू दे.. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे". त्यावर सायली म्हणते,"तुमच्या विश्वासाला तडा नाही जाणार. आज या महिपत-साक्षीने आपलं घर तोडलं? आता त्यांची गाठ माझ्याशी आहे". 






संबंधित बातम्या


Jui Gadkari : 'तुझी जात कोणती?' जुई गडकरीला चाहत्याचा थेट प्रश्न; अभिनेत्रीच्या उत्तराने जिंकली सर्वांची मने