Jui Gadkari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत जुई गडकरीचा (Jui Gadkari) समावेश आहे. 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून सध्या ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतचं इन्स्टावर तिने 'अ क्वीक क्वेशन अॅन्ड अॅन्सर' या सेशनच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. दरम्यान एका चाहत्याने अभिनेत्रीला तिची जात कोणती आहे? असा प्रश्न विचारला आहे.


जुई गडकरीची जात कोणती? (Jui Gadkari  Cast)


अभिनेत्रीने जुई गडकरीला एका चाहत्याने ताई तुझी जात कोणती आहे? असा प्रश्न विचारला आहे. याप्रश्नाचं उत्त देत अभिनेत्री म्हणाली,"मी भारतीय आहे". अभिनेत्रीच्या या उत्तराने सर्वांचीच मने जिंकली आहेत.


 


एका चाहत्याने जुई गडकरीला विचारलं आहे,"सायली आणि जुईमध्ये काय फरक आहे?". यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"माझ्या सायलीएवढी सहनशक्ती नाही. मी एक-दोन वेळा सांगून बघते त्यानंतर त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून मी कट करते. नो भांडण नो राग. बाकी मी तिच्यासारखीच आहे". 


जुई गडकरी नाटकात काम करायला इच्छुक आहे का? या चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"नक्कीच. मी एका चांगल्या संधीची प्रतीक्षा करत आहे". जुईची 'पुढचं पाऊल' ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत तिने साकारलेल्या कल्याणीचं आजही प्रचंड कौतुक होतं.  यासंदर्भात एका चाहतीने लिहिलं आहे,"ताई तू माझ्या सासूला खूप आवडतेस. त्या आमच्या मुलीला कल्याणी नावाने हाक मारतात". 


राग आल्यावर जुई गडकरीची प्रतिक्रिया कशी असते? 


जुईला एका चाहत्याने विचारलं आहे,"राग आल्यावर तू कशी रिअॅक्ट होते?". यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"मी जेव्हा नॉर्मल चिडलेली असते तेव्हा खूप बडबड करते आणि दोन मिनिटात आपल्याला राग आला होता हे विसरुन जाते. पण जेव्हा मला खरोखर खूप राग येतो तेव्हा मी काहीच बोलत नाही. मी पूर्णपणे शांत होऊन जाते. प्रत्येकाची रिअॅक्ट होण्याची पद्धत वेगळी असते. मी पूर्णपणे शांत होते".


जुई गडकरीबद्दल जाणून घ्या.. (Who is Jui Gadkari)


जुई गडकरी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पुढचं पाऊल','तुजवीण सख्या रे','बिग बॉस मराठी 1','माझिया प्रियाला प्रीत कळेना' अशा एका पेक्षा एक मालिकांच्या माध्यमातून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत तिने सायलीचं पात्र साकारलं आहे. अनेकदा ती मालिकेच्या सेटवरील फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 


संबंधित बातम्या


Marathi Serials : टीआरपी शर्यतीत 'ठरलं तर मग'चं अधिराज्य कायम, 'या' मालिकांच्या TRP मध्ये झाली घसरण