एक्स्प्लोर

Ulhasnagar : FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Ulhasnagar FDA Action : उल्हासनगरमध्ये जास्त दूध उत्पादनासाठी म्हशींना दिली जाणारी बंदी घातलेली 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स अन्न व औषध प्रशासनाने जप्त केली आहेत.

Ulhasnagar FDA Action : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नातील भेसळ आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे. म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिली जाणारी आणि शासनाने बंदी घातलेली तब्बल 612 ऑक्सिटोसिन (Oxytocin) इंजेक्शन्स एफडीएच्या पथकाने जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी याच्या म्हशीच्या गोठ्यावर एफडीएच्या पथकाने हा छापा टाकला. या छाप्यात जास्त दुधासाठी जनावरांना टोचली जाणारी 612 प्रतिबंधित इंजेक्शन्स आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Oxytocin Side Effects : जनावरांसह मानवी आरोग्याला मोठा धोका

ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि क्रूर मानला जातो. या इंजेक्शन्समुळे जनावरांना प्रचंड त्रास होतो. इतकेच नाही तर, अशा प्रकारे ऑक्सिटोसिन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर, विशेषतः लहान मुलांवर आणि गरोदर महिलांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. याच कारणामुळे या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर शासनाने कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

Tukaram Mundhe FDA Campaign : तबेला चालकावर कठोर कारवाई

राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित गोठा चालकावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर दुग्ध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
धक्कादायक!  21 व्या मजल्यावरुन तोल जाऊन खाली पडल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू, ठाण्यातील माजीवाडा परिसरातील घटना
धक्कादायक!  21 व्या मजल्यावरुन तोल जाऊन खाली पडल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू, ठाण्यातील माजीवाडा परिसरातील घटना
Siddhivinayak Mandir : मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget