एक्स्प्लोर

लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. 

ठाणे - राज्यातील अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून दोन दिवसांपूर्वी सांगलीत भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. आता, भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपा या गावचे रहिवासी आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अपघातीची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कारचालकास ताब्यात घेतलं आहे. 

भिवंडीहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनार कार ( MH 04KW1746) दुगाड फाटा येथे येताच गाडीला अपघात झाला. येथील रस्त्यावर अगोदर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली. त्यानंतर, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. विशेष, महिलेला धडक दिल्यानंतर कारचालकाने वेगाने कार पुढे नेली. अपघाताच्या भीतीने सदर कार ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कारचालकाने येथेही नियंत्रण सुटले. त्यामुळे, वारेट गावच्या हद्दीत सदर कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सख्ख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही भाऊ जागीच ठार झाले, या्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

आपली कुठलीही चूक नसताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनामुळे दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे, गावकऱ्यांना तीव्र संतापाची भावना असून गावावर शोककळा पसरली आहे. पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील या दोन सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 

हेही वाचा

Akola Crime News : डबल मर्डरच्या घटनेनं अकोला हादरलं! धारदार शस्त्रांनी वार करत दोघांना संपवलं

 

महत्त्वाच्या बातम्या

छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
डिलिमिटेशनला पाठिंबा म्हणजे संविधानाची मोठी हानी, पक्षाच्या भूमिकेलाच जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा विरोध, नताशा आव्हाडांची पोस्ट चर्चेत
डिलिमिटेशनला पाठिंबा म्हणजे संविधानाची मोठी हानी, पक्षाच्या भूमिकेलाच जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा विरोध, नताशा आव्हाडांची पोस्ट चर्चेत
Nala Sopara Chhath Puja : नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
Badlapur Chhath Puja : छटपुजेच्या नावाखाली उल्हास नदीपात्रात मातीचा भराव; शासनाकडून ब्लू लाईनची घोषणा, तरीही प्रशासन गप्प का? बदलापुरात संतापाचा उद्रेक!
छटपुजेच्या नावाखाली उल्हास नदीपात्रात मातीचा भराव; शासनाकडून ब्लू लाईनची घोषणा, तरीही प्रशासन गप्प का? बदलापुरात संतापाचा उद्रेक!

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget