एक्स्प्लोर

Thane News : मेट्रोच्या कामासाठी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल

Thane News : मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार येत आहे. या कामामुळे घोडबंदर रोड 25, 26, 27, 28, 29 आणि 30 डिसेंबर 2022 पर्यंत रात्री 23.55 ते सकाळी 04.00 वाजेपर्यंत वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे.

Thane News : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) मेट्रो मार्गाचं काम सुरु आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत रिलायन्स अस्टाल्डी जॉइन्ट व्हेंचर या कंपनीकडून मेट्रो 4 चे (Metro 4) काम चालू असून मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार येत आहे. या कामामुळे ब्रह्मांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्यासाठी घोडबंदर रोड 25, 26, 27, 28, 29 आणि 30 डिसेंबर 2022 पर्यंत रात्री 23.55 ते सकाळी 04.00 वाजेपर्यंत वाहतुकीकरता बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

घोडबंदर मार्गावरुन जड, अवजड तसंच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या मार्गावर सध्या घाटकोपर ते गायमुख या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर उद्यापासून ते 30 डिसेंबर पर्यंत रात्री 11.55 ते पहाटे 4 पर्यंत मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.

असे आहेत वाहतुकीमधील बदल!

मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन इथे प्रवेश बंद करण्यात येत आहे तर मुंबई ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका मानकोली अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अनुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाण्याच्या सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Panvel Karjat Local Train Project: पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; लवकरच लोकल धावणार, कसा आहे प्रकल्प?, A टू Z माहिती
पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; लवकरच लोकल धावणार, कसा आहे प्रकल्प?, A टू Z माहिती
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
Embed widget