एक्स्प्लोर

Thane Metro : मुंबई मेट्रोचं झालं, पण ठाणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न अजूनही अपूर्ण, दहा वर्षांपासून काम रखडलं

Thane Metro 4 A : ठाण्यात एकीकडे नव्या प्रकल्पांची घोषणा केली जात आहे, मात्र दुसरीकडे ठाणे मेट्रोचे काम अर्धवट आहे. त्यामुळे हे काम आधी पूर्ण करा अशी मागणी ठाणेकर करताना दिसत आहेत. 

ठाणे : एकीकडे मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने पसरत असताना दुसरीकडे ठाणेकरांचे मेट्रोचे (Thane Metro) स्वप्न अजूनही पूर्ण होत नाही. ठाण्यातून जाणारी मेट्रो 4 मार्गिका गेली दहा वर्षे रखडली आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ट्रायल रन तर सुरू झाली. मात्र एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये अजूनही पहिल्या टप्प्यातील काही स्थानकांचे काम अपूर्ण असल्याचे दिसून आलं आहे. पहिला टप्पा कार्यान्वित होण्यासाठी अजून वेळ लागेल अशीच चिन्हे आहेत. हा उशीर का होतोय, वारंवार डेडलाईन पुढे का जात आहे, याबद्दल विचारणा करूनही एमएमआरडीएकडून (MMRDA) कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली भूमिपूजन करून ठाणे मेट्रोच्या कामाचा शुभारंभ केला होता, प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली. मात्र या नंतर मान्यता मिळालेल्या आणि बांधकाम सुरू झालेल्या मेट्रो आज सेवेत दाखल झाल्या. पण मेट्रो 4 आणि 4 अ चा पहिला टप्पा देखील अजून कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे हजारो कोटींचे रस्त्याचे प्रकल्प सुरू करण्यापेक्षा जे अर्धवट प्रकल्प आहेत ते पूर्ण करा अशी मागणी ठाणेकर करत आहेत. 

Thane Metro Update : मेट्रोचे काम अर्धवट

या मेट्रोचा पहिला टप्पा कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा मागील वर्षी सुरू होणार असेल सांगण्यात आले होते. मात्र आता एप्रिल महिना उजाडला तरी या पहिल्या टप्प्याचे काम अर्धवट आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे-बोरिवली या भुयारी रस्त्याचे TBM कार्यान्वित केले. दुसरीकडे ठाणे कोस्टल रोडचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र जर मेट्रो वेळेत सुरू झाली असती तर आज हजारो कोटी रुपये खर्चून हे प्रकल्प करण्याची गरज भासली नसती. 

Thane Metro Tax : मेट्रो सेजच्या माध्यमातून नागरिकांकडून शुल्क

या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी शासनाकडून या भागातील गृहखरेदी विक्री व्यवहारावर मेट्रो सेजही लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महामार्गाच्या सेवा रस्त्यांच्या लगतच वेगाने कामे सुरू करण्यात आली होती. मेट्रो सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून सेजच्या माध्यमातून नागरिकांकडून शासकीय शुल्क आकारण्यात येत असले तरी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Thane Metro Deadline : आता पर्यंत हुकलेल्या डेडलाईन 

  • सुरुवातीला 2021-22 मध्ये मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. त्यानंतर आलेल्या करोनामुळे मेट्रो प्रकल्पाची कामे रखडली.
  • या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 ची नवी तारीख देण्यात आली होती. या तारखेला देखील प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
  • त्यानंतर जून 2025 ची नवीन तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून प्रकल्प डिसेंबर 2025 नंतर पूर्ण होऊ शकणार असे सांगण्यात आले. 
  • त्यानंतर ट्रायल रन घेऊन पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू करू असेल सांगून नवी डेडलाईन दिली. ती देखील हुकली. अजूनही पहिला टप्पा सुरू झालेला नाही. 

विधान परिषदेत सरकारचे उत्तर 

मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही मेट्रो कधी पर्यंत सुरू होईल? असे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विचारले असता, मंत्री माधुरी मिसाळ यांनी त्याला उत्तर दिले होते. मेट्रो 4 ची पहिला फेज एप्रिल 2026 पर्यंत खुली करतोय. दुसरी फेज ही डिसेंबर 2026 पर्यंत तर फेज 3 नोव्हेंबर 2027 पर्यंत खुली केला जाईल, असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलं होतं.

मंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड हे सांगूनही अजून स्टेशनवर काम अपूर्ण असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. त्यात नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन राज्य सरकार करत आहे. त्यामुळे आधी अर्धवट प्रकल्प पूर्ण करा, जे गरजेचे आहे ते आधी द्या, नको तिकडे पैसे खर्च करू नका, मेट्रो सुरू करा असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला सांगंतले आहे. 

ही बातमी वाचा:

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! वैचारिक मतभेद होते, मात्र असं कृत्य माझ्याकडून कधीच घडणार नाही, मिनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया  
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! वैचारिक मतभेद होते, मात्र असं कृत्य माझ्याकडून कधीच घडणार नाही, मिनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया  
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
Pradeep Purnekar Death Case मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget