एक्स्प्लोर

Thane : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश

Thane District Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने परिवर्तन पॅनलचा पराभव केला असून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी मिळून बहुमत मिळवल्याचं चित्र आहे.

Thane District Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या राजकारणाचे वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्य आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या पॅनलमधून एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. अखेर 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत 'सहकार पॅनल'ने या निवडणुकीत बाजी मारली.

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत वेगळी राजकीय रणनीती आखल्याची चर्चा आहे.

दोन्ही पॅनलमध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार

या निवडणुकीत 'सहकार पॅनल'मधून शिंदे गटाच्या उमेदवारांसह आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार मैदानात होते. तर दुसरीकडे 'परिवर्तन पॅनल'मध्येही भाजपचे चार आणि शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडणूक लढवत होते.

दोन्ही पॅनलमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यामागे कार्यकर्ते आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे कारण संबंधित नेत्यांकडून देण्यात आले होते.

महायुतीच्या 13 उमेदवारांचा विजय

21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 11 जागांची आवश्यकता होती. निकालानुसार भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 5 असे एकूण 13 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, या निकालामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.

सत्तेचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे लक्ष लागले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुती बँकेवरील सत्ता स्वतःकडे ठेवणार की बहुजन विकास आघाडीसोबत काही वेगळी भूमिका घेणार, याबाबतच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Embed widget