एक्स्प्लोर

Eknath Shinde : उल्हासनगरमध्ये शिवसेनेला धक्का, 18 नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र'; शिंदे गटात केला प्रवेश

Shivsena : एकनाथ शिंदे गटामध्ये नगरसेवकांचे इनकमिंग सुरूच असून आज नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

ठाणे: आमदारांच्यानंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. आज उल्हासनगरच्या (Ulhasnagar) 18 नगरसेवक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे. आज या राज्यातील आमदारांसोबत अनेक नगरसेवक, शाखाप्रमुख, शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, आज उल्हासनगरचे 15 शिवसैनिक आपल्यासोबत आले आहेत, त्यांना हे आपलं सरकार वाटतंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

राज्यातील 50 आमदार आणि अनेक पदाधिकारी आपल्यासोबत असल्याने आपल्याला राजकारण करायचं नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांची द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका होती, त्यांचं आपण स्वागत करत असल्याचंही ते म्हणाले.

ठाणे महापालिकेतील जवळपास 65 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर नगरसेवकांचे इनकमिंग जोरात सुरू झाले. त्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण डोंबवलीमधील नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाकडे कल दर्शवला. आता नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जातोय. 

मुंबईच्या नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शितर म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. 

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या समाधीचे दर्शन
गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिंना वंदन केलं. नंतर त्यांनी ठाण्यात जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतिंना वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच इतक्या मोठ्या पदापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक पोहोचू शकलेला आहे, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आम्ही पुढे नेतोय असं सांगितलं. महाराष्ट्राचा विकास हेच युती सरकारचं ध्येय आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Vasai Virar Anilkumar Pawar News: 300 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात अनिलकुमार पवार दोषमुक्त; ‘मनी ट्रेल’ सिद्ध करण्यात ED अपयशी
300 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात अनिलकुमार पवार दोषमुक्त; ‘मनी ट्रेल’ सिद्ध करण्यात ED अपयशी
Ram Purnekar Meet Devendra Fadnavis: राम पूर्णेकर आणि देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट; भेटीनंतर प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा
राम पूर्णेकर आणि देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट; भेटीनंतर प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा
Bhiwandi Crime News: विजय सेल्सच्या वॉचमनचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; मंगेश शिरमाळे 30 तासांपासून होते बेपत्ता, भिवंडीमधील घटना
विजय सेल्सच्या वॉचमनचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; मंगेश शिरमाळे 30 तासांपासून होते बेपत्ता, भिवंडीमधील घटना

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget