लोकल प्रवाशांच्या समस्यांवर रवींद्र चव्हाण 'अॅक्शन मोड'वर, DRM सोबत महत्त्वाची बैठक
Ravindra Chavan Railway DRM Meeting : कल्याण-डोंबिवली परिसरातील रेल्वे प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी आणि निळजे व डोंबिवली येथून मुंबईसाठी थेट लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

मुंबई : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण 'अॅक्शन मोड'वर आले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मुख्यालयात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक (DRM) हिरेश मीना यांच्यासोबत एक उच्चस्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शनिवार, २६ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या गंभीर समस्या मांडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या मागण्यांची तातडीने दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
निळजे आणि डोंबिवलीतून थेट मुंबईसाठी लोकल सुरू करण्याची मागणी
या बैठकीदरम्यान ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची होणारी घुसमट थांबवण्यासाठी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी रेल्वे प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. गर्दीच्या वेळेत निळजे स्थानकातून मुंबईच्या दिशेने दर तासाला थेट रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी डोंबिवली आणि दिवा स्थानकातून थेट मुंबईसाठी लोकल फेऱ्या (Mumbai Local) चालवण्यात याव्यात. उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्यांमुळे होणारा प्रवाशांचा संताप लक्षात घेता गाड्यांच्या वेळेत सुधारणा करणे, गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांची सुरक्षा यावर तत्काळ मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
प्रवासी संघटनांच्या पाच प्रमुख मागण्यांवर भर
कळवा–ऐरोली रेल्वे लिंक: कळवा-ऐरोली रेल्वे लिंकचे काम वेगाने पूर्ण करून प्रवाशांसाठी ही थेट सेवा लवकरात लवकर सुरू करावी.
३ री व ४ थी रेल्वे लाईन : बदलापूर–कर्जत आणि कल्याण–कसारा मार्गावरील ३ऱ्या व ४थ्या रेल्वे लाईन प्रकल्पाच्या कामाला गती देणे.
विशेष शटल सेवा: ठाणे- कर्जत आणि ठाणे–कसारा दरम्यान दैनंदिन प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष शटल ट्रेन सुरू करणे.
सिग्नल्स व हेडवे सुधारणा: अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लागू करून दोन लोकल गाड्यांमधील वेळेचे अंतर (Headway) कमी करणे, जेणेकरून फेऱ्यांची संख्या वाढवता येईल.
थेट कनेक्टिव्हिटी: दिवा–वसई–पनवेल मार्गावर थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कल्याण जंक्शनसह सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप





















