एक्स्प्लोर

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

प्रदीप पूर्णेकर ( Pradeep Purnekar) हत्या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना लवकरच चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.

Pradip Purnekar Case News :  ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर ( Pradeep Purnekar)  यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder news) करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना लवकरच चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरु 

आज मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरु आहे. गेल्या 7 तास चौकशी सुरु आहे. मिनाक्षी शिंदे यांच्यामुळे जिवाला धोका आहे असं जाहीररित्या अनकेदा प्रदिप पुर्णेकर बोलले होते. तर, पुर्णेकरांच्या हत्येनंतर या हत्येमागे मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजा शिंदे यांचा हात असल्याचा आरोप पुर्णेकर परिवाराने केला होता.  

प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री झाली होती हत्या

प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार मारले होते. याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजकीय वैर आणि स्थानिक पातळीवर वर्चस्वाच्या लढाईतून मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनीच प्रदीप पूर्णेकर यांना सुपारी देऊन संपवले, असा दावा पूर्णेकरांच्या कुटुंबाने केला होता. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांकडून पुरवणी एफआयआरमध्ये राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचा समावेश केला होता. मात्र, या दोघांविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता राजेंद्र शिंदे यांना चौकशीला बोलावल्याने आणि पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांसमोर बसवून त्यांची चौकशी होत असल्याने पोलिसांच्या हाती एखादा महत्त्वाचा दुवा लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष कनजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू या दोघांना काहीवेळापूर्वीच ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा येथे चौकशीसाठी आणण्यात आले. क्राईम ब्रांचकडे सध्या हत्येत सहभागी पाचही आरोपी अटकेत आहेत. त्यांना देखील समोरासमोर बसवून उलट तपासणी करण्यात आली. या चौकशीत समोर आलेले मुद्दे घेऊन आज राजेंद्र शिंदे यांना चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता  आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांची आता समोरासमोर चौकशी सुरू आहे.

 

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Chhath puja: मुंबईतील वडाळा स्थानकात छटपूजेनिमित्त रेल्वे अधिकाऱ्याने वाजवले भोजपुरी गाणे, ठाकरे गट आक्रमक, बदलापूरमध्येही वातावरण तापलं
मुंबईतील वडाळा स्थानकात छटपूजेनिमित्त रेल्वे अधिकाऱ्याने वाजवले भोजपुरी गाणे, ठाकरे गट आक्रमक, बदलापूरमध्येही वातावरण तापलं
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Mumbai Local Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Embed widget