एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये मुसळधार, तब्बल 962 वर्ष जुन्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

Mumbai rain Update News : मागील दोन दिवसांपासून अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं आहे. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं आहे.

Mumbai rain Update News : मागील दोन दिवसांपासून अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं आहे. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं आहे.

अंबरनाथमध्ये तब्बल 962 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी वाहते. प्राचीन शिवमंदिरातून पिंडीवरील पाणी बाहेर जाण्यासाठी एक आऊटलेट थेट वालधुनी नदीत सोडण्यात आलंय. गेल्या 2 दिवसांपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे. नदीचं हेच पाणी या आऊटलेटमधून थेट गाभाऱ्यात शिरलं. ज्यामुळे शिवलिंग देखील पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवलिंगावरील मुखवटा, नाग हे काढून ठेवण्यात आलं आहे. बदलापूरमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकलचाही खोळंबा झालाय. मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

बदलापूरमध्ये पूरस्थिती -

बदलापूरमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सकाळी 9 वाजता पाणी पातळी 16.50 मीटर इतकी होती.  धोक्याची पातळी 17.5 मीटर इतकी आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याच्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या आहेत. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे. 

बदलापुरात मांजरली परिसरातील 3 रहिवासी इमारतींचा मुख्य रस्ता बंद

दोन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बदलापूर पश्चिम दिपाली पार्क मांजर्ली परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे.  या परिसरातील तीन ते चार इमारतीमधील रहिवासी या इमारतीत अडकले आहेत. या ठिकाणी एकच रस्ता वाहतुकीसाठी असल्याने याच रस्त्यावर दोन दिवसांपासून पाणी साचून आहे. दरवर्षी या परिसरात हीच परिस्थिती कायम असते, आणि याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नसल्याने, येथील नागरिक आता प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.  

बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रकवर साचलं पाणी, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागील तासभरापासून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे बदलापूर स्थानकात मुंबई आणि कर्जत च्या दिशेने प्रवास करणारे प्रवाशी बदलापूर स्थानकावर अडकले आहेत. तर काही प्रवासी लोकलची प्रतीक्षा करत थांबले आहेत.

लोकल बंद पडल्यामुळे महिला रुग्णाला फटका

बदलापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा दणका मध्य रेल्वेला बसला असून, बदलापूर रेल्वे स्थानकातून एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना होणार नाही अशी सूचना प्राप्त झाल्या. त्यानंतर, फलाट क्रमांक एकवर मुंबई साठी जाणाऱ्या लोकलमध्ये, उपचारासाठी सायन रुग्णालयात जाणाऱ्या महिलेला याचा फटका बसला आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या या महिलेला आता पुन्हा घरी माघारी फिरावं लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget