एक्स्प्लोर

Thane Rada VIDEO : आधी गाडीवर बांगड्या, शेण फेकले, नंतर मनसैनिक थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात घुसले; ठाण्यात शिवसेना-मनसेत राडा

Shiv Sena Vs MNS : मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये राडा घालत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यामुळे ठाण्यात मोठा राडा झाला. 

ठाणे : राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं असून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांनी शेण टाकलं आहे. त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले. त्यामुळे या ठिकाणी आता मोठा गोंधळ झाला आहे. 

मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 

शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे येत असताना त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. नंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत थेट रंगायतनमध्ये घुसले. त्यानंतर गोंधळ घालायला सुरूवात केली.

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. 

जशास तसं उत्तर देणार

राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्यावर आता शिवसैनिक कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल. 

 

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Mira Bhayandar Crime News: मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget