कल्याण : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना आज मिळणारा डिस्चार्ज पुढे ढकलला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळेल असं सांगण्यात येत होतं. पण डॉक्टरांनी महेश गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली, त्यावेळी त्यांना चालताना त्रास होत असल्याचं जाणवलं. शरीरावर सूज असल्यामुळे त्यांना चालताना त्रास होत आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. 


ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी महेश गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यादरम्यान महेश गायकवाड यांना डॉक्टरांनी चालण्याचा सराव केला. त्यामध्ये महेश यांना चालण्यासाठी त्रास जाणवला. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ऑपरेशन केले आहे, त्या ठिकाणी अजूनही सूज असल्याने, डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय रद्द केला. आता महेश गायकवाड यांना पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 


महेश गायकवाड यांच्या स्वागताचे बॅनर


दरम्यान, तब्बल 13 दिवसानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं वृत्त आल्याने, समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. 
महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले असून, त्यावर टायगर इज बॅक ,भावी आमदार असं लिहिलं आहे.  या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंसह बॅनरवर वाघाचा फोटो देखील दर्शविण्यात आला आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या डिस्चार्जनंतर ठाण्यातून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत मोठ्या संख्येने त्यांचे चाहते आणि समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. 


गणपत गायकवाड यांचा गोळीबार


भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता.   उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.  या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


संबंधित बातम्या   


महेश गायकवाडकडेही पिस्तुल होतं, त्याला काढता आलं नाही, गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणात अजित पवारांचा गौप्यस्फोट


महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून बॅनरबाजी! 'टायगर इज बॅक', 'भावी आमदार' आशयाचे बॅनर