एक्स्प्लोर

Jitendra Awhad : महेश आहेर हल्ला प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर कारवाईची टांगती तलवार, आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत

Jitendra Awhad : जीवे मारण्याचा कट असल्याचा आव्हाडांनी अहिर यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत.  

ठाणे:  ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश अहीर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक झाली. मात्र आरोपी नंबर एक असलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अटक केलेली नसून आज कारवाई होण्याची शक्यता आहे. तर आव्हाडदेखील आज अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार आहेत.  दरम्यान आज चारही आरोपींना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे.

जितेंद्र आव्हाडांपासून माझ्या कुटुंबाला धोका असल्याचा दावा महेश आहेर यांनी केला आहे. तर जीवे मारण्याचा कट असल्याचा आव्हाडांनी आहेर यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत.  

बुधवारी (15 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदूक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

ऑडिओ क्लिप व्हायरल  

जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी, पैसे मोजणारा व्यक्ती त्यांचा जमा-खर्च सांभाळणारा; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
Bhiwandi Shawarma Poisoning Marathi News: भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget