भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराचा (Bike) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये या व्यक्तीची मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुभाष केशरी नायक 35 वर्षीय असं या व्यक्तीचं नाव आहे. या अपघाताची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना (Police) देण्यात आली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले. परंतु सुभाष यांचा यामध्ये मृत्यू झाला. 


दरम्यान पोलिसांकडून या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. तर  घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सध्या भिवंडी तालुक्यात पोलिसांकडून या संदर्भात गुन्ह्यांची नोंद केली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 


नेमकं काय घडलं? 


तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोगाव पाईप लाईन मार्गावरुन आपलं कामकाज आटोपून सुभाष नायक हे आपल्या दुचाकीवरुन घरी येत होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यातच मागून येणारा आणखी एक दुचाकीस्वार या अपघातग्रस्त दुचाकीला धडकला. त्यामुळे तीन दुचाक्यांचा एकाच वेळी अपघात झाला. तर या अपघातामध्ये सुभाष केशरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित दोन दुचाकीस्वार यामध्ये गंभीर जखमी झालेत. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


या अपघातामुळे सुभाष यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान यामध्ये पोलिसांकडून पुढील तपास देखील करण्यात येतोय. तसेच यामध्ये जखमी झालेल्या दोघांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत देखील कुटुंबियांना चिंता लागून राहिली आहे. अपघात झाला तो रस्ता आडबाजूला असल्यामुळे वाहतूकीचा कोणत्याही प्रकारचा खोळंबा झाला नाही. तर पोलिसांनी देखील आजूबाजूची परिस्थिती तात्काळ नियंत्रणामध्ये आणली. त्यासाठी पोलिसांना जमलेल्या लोकांनी देखील सहकार्य केलं. 


मुंबई विमानतळावर भीषण अपघात 


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चेकपॉईंटवर एका BMW कारने CISF अधिकाऱ्याला धडक दिली. कार चालवणाऱ्या एका 19 वर्षीय मुलाला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सहार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गंभीर जखमी राहुल सुरेश शर्मा यांच्यासह सीआयएसएफ जवानांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.


हेही वाचा : 


Mumbai Airport : मुंबई विमानतळावर भरधाव BMW कारची CISF अधिकाऱ्याला धडक, 19 वर्षीय युवक ताब्यात