Mumbai Airport Accident : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चेकपॉईंटवर एका BMW कारने CISF अधिकाऱ्याला धडक दिली. कार चालवणाऱ्या एका 19 वर्षीय मुलाला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सहार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गंभीर जखमी राहुल सुरेश शर्मा यांच्यासह सीआयएसएफ जवानांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.


ही घटना रविवारी पहाटे चारच्या दरम्यान झाली. सीआयएसएफचे अधिकारी त्यांची ड्युटी करत असताना त्यांना कारने धडक दिली. मोटारकर क्र DD 0310305 ही हृदय सज्जनराज कावर या 19 वर्षाचा युवक चालवत होता. त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सहार पोलिसांनी भा द वि कलम 279, 338 आणि मोटार वाहन कायदाचा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


ही बातमी वाचा: