एक्स्प्लोर

KDMC News: काँक्रीटीकरण झाडांच्या मुळावर, एमएमआरएडीएने 110 झाडे तोडण्याची मागितली परवानगी 

काँक्रीटीकरणात बाधित झाडे तोडण्याची परवानगी एमएमआरडीएने केडीएमसीकडे केली आहे तर झाडे तोडू नका  बाधित झाडांचे पुनर्ररोपण करा अशी मागणी  स्थानिकांनी केली आहे. 

KDMC News: एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या काँक्रीटकरणाचं काम सुरू आहे. या कामामुळे सुमारे 110 झाडे बाधित होत आहेत. रस्त्या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी मात्र ही झाडे तोडण्यास विरोध केलाय. एमआयडीसी मधील निवासी परिसरातील प्रदूषणनाणे  त्रस्त आहेत. झाडे तोडल्यास प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा वाढेल त्यामुळे झाडे न तोडता झाडांचे पुनररोपण करा अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत महापालिका प्रशासनाने मात्र अर्ज प्राप्त झाला असून मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष पाहणी करून खरच झाडे तोडण्याची गरज आहे का ? जास्तीत जास्त झाडे कशी वाचवता येतील ,झाडांचे पूनररोपण करता येईल का या बाबी तपासून  पुढील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यामुळे आता महापालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

डोंबिवली निवासी भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. निवासी भागात प्रदूषणाचा त्रास असल्याने ही वनराई प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी कामी येते. या भागात रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते विकासाचे काम एम. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दिलेल्या प्रस्तावानुसार जवळपास 110 झाडे या रस्ते विकास कामात बाधित होत असल्याने ही झाडे तोडण्याची अनुमती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली आहे. या ठिकाणच्या नागरीकांनी मात्र या वृक्षतोडीला विरोध केला आहे. रस्ते विकासाला आमचा विरोध नाही. मात्र झाडे न तोडता ती वाचविता आल्यास ते पाहावे. तसेच झाडे तोडण्या ऐवजी त्याचे पुनरेपन करावे अशी मागणी नागरिकांनी  केली आहे. या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यास नागरीकांचा झाडे तोडण्यास विरोध राहिल असे इशारा या ठिकाणच्या नागरीकांकडून देण्यात आला आहे.

यासंदर्भात महापालिकेचे वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख संजय जाधव यांनी संबंधित कंत्रटदाराने एमएमआरडीएच्या माध्यमातून २४ आणि ४ झाडे अशी २८ झाडे तोडण्याची परवानगी स्वतंत्र दोन अर्जाद्वारे केली आहे. त्यावर अद्याप प्राधिकरणाकडून काही एक विचार विनिमय झालेला नाही. या अर्जाची छाननी केली जाईल. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाईल. झाडे वाचविण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जाणार आहे. गरज असल्यास ती तोडली जातील अन्यथा त्याचे पुन ररोपण करण्याचाही विचार केला जाईल. तूर्तास तरी एकही झाड तोडण्याची परवानगी दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde : बळीराजाच्या कल्याणासाठी श्रीकांत शिंदेंकडून सहस्रचंडी महायाग; डोंबिवलीत घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात
बळीराजाच्या कल्याणासाठी श्रीकांत शिंदेंकडून सहस्रचंडी महायाग; डोंबिवलीत घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget