Kalyan-Shil Road Traffic Updates: कल्याण-शीळ रोडवरील (Kalyan-Shil Road) लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवा पूल निर्माण करण्याचं काम सरू आहे.  नव्या पुलाचं काम करण्यासाठी कल्याण फाटाकडून कल्याणकडे (Kalyan News) जाणाऱ्या रस्त्यावर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. या पार्शवभूमीवर या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.


15 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. याकालावधीत सदर ररस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. 


देसाई खाडीवर नवा पूल निर्माण करण्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीत कोणते बदल करण्यात आलेत?


कल्याण फाटाकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी कल्याण फाटाकडून कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनं ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.


कल्याणकडून कल्याण फाटाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक कल्याणकडून कल्याण फाटाकडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनं ही बदलापूर चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे वळवण्यात आली आहे. 


मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्तही वाहतूकीत बदल 


दरम्यान, मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्व साईबाबा सागाव चौक ते मानपाडा चौक दरम्यान रस्त्याचे खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर भागात वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.