Kapli Patil On Uddhav Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी समृद्धी मार्गाचे श्रेय लाटण्यावरुन केलेल्या आरोपांना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील (Kapli Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. मंत्री कपिल पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं की, समृद्धी महामार्गाची संकल्पना (Samruddhi Mahamaga) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचीच होती. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याना तो पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती आणि देवेंद्रे फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करत आपण त्यांचा विश्वास संपादन केला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेय लाटण्याचा प्रश्न नसून ज्यांनी सुरुवात केली, त्यांनीच शेवट केला आणि हीच गोष्ट सत्य आहे, असे कपिल पाटील यांनी सांगितले.
आदी आदर्श गाव योजनेत 121 गावे दत्तक – मंत्री कपिल पाटील
कपिल पाटील यांनी म्हटलं की, ठाणे जिल्ह्याचा एक भाग टोकाचा विकास झालेला तर दुसरा भाग टोकाचा अविकसित आहे. हे अंतर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवत केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून आदर्श गाव योजना राबविण्यात येणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास झाला असं बोलता येईल आणि मला विश्वास आहे. हे अंतर कमी करून पूर्ण ठाणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे , असे आपल्याला बोलता येईल असे कपिल पाटील यांनी सांगितले.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 121 गावे निवडण्यात आली आहेत. या गावांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून एक योजना जाहीर झाली आहे. प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजना या योजनांचे आम्ही डीपीआर बनवले आहेत.यासाठी बैठका घेतल्या असून डीपीआर बनवून केंद्र सरकारकडे पाठवले आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून काम करून ही गावे आपल्याला आदर्श करायची आहेत. जिल्ह्यातील 121 गावे दोन टप्प्यात ही गावे आदर्श करायची आहेत मात्र सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत झाली तर पहिल्याच टप्प्यात ही गावे आदर्श करू असे त्यांनी सांगितले.
दिलगिरी व्यक्त केली की अशी कृती होणं चुकीचं - कपिल पाटील
कपिल पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेवर बोलताना म्हटलं की, एखाद्याने घडलेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत चूक मान्य केल्यानंतर अशा प्रकारची कृती होण योग्य नाही. अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत, असंही ते म्हणाले.
ही बातमी देखील वाचा