एक्स्प्लोर

Kalyan : पाणी प्रश्नसाठी महिलांचा रास्ता रोको, पाणी प्रश्न सोडवा अन्यथा पाच ते सहा हजार नागरिक रस्त्यावर उतरतील, महिलांचा इशारा

Kalyan : कल्याण पूर्वेकडील टाटा नाका परिसरात देशमुख होम्स कॉम्प्लेक्समधील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे.

Kalyan : कल्याण पूर्वेकडील टाटा नाका परिसरात देशमुख होम्स कॉम्प्लेक्समधील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. अनेकदा निवेदने, तक्रारी ,मोर्चा आंदोलन करून देखील ही पाणी समस्या आजही कायम आहे . कल्याण डोंबिवली महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून नेहमीच आश्वासन दिले जातात मात्र नळाला पाणी नसते. त्यामुळे अखेर संतापलेल्या महिलांनी आज रस्त्यावर उतरत कल्याण शिळ रोड वरील टाटा पावर नाका या ठिकाणी रास्ता रोको केला. जवळपास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन कर्त्याना बाजूला सारले. यावेळी नागरिकांनी पाणी समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला दिलाय. माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिक पाण्यासाठी रडतोय, आंदोलन केल तर पोलिस कारवाई करतात ,पाणी समस्या मार्गी लागली नाही तर पाच ते सहा हजार नागरिक आंदोलन करतील मग आम्ही जेलला गेलो तरी चालेल, तिकडे आम्हाला पाणी पाजा असा इशारा यावेळी दिला.

कल्याण शिळ रस्त्यालगत पीसवली परिसरात देशमुख होम्स ही 40 इमारतीची सोसायटी आहे. सात ते आठ हजार नागरिक या सोसायटीत राहतात मात्र नागरिकांना पाणी समस्या भेडसावत असून कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्यामुळे पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नागरीक आंदोलने, मोर्चा निवेदने या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लढा देत आहेत. मात्र तरीही कल्याण डोंबिवली महापालिका ,एमाय डी सी प्रशासनाकडून या नागरिकाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहिले जात नसल्याने पाणी प्रश्न जैसे थे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. 

यामुळेच त्रस्त नागरिकांनी प्रशासनाला रस्ता रोकोचा इशारा देत पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती, मात्र यानंतर या नागरिकांना समज देत पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ऐन गर्दीच्या वेळी  संध्याकाळी 5 वाजता सोसायटी मधील शेकडो त्रस्त महिलांनी कल्याण शिळ रस्त्यावर टाटा पावर येथे रास्ता रोको करत वाहतूक रोखली. मिनिटाला काही हजार वाहनाची ये जा असलेल्या या रस्त्यावर तब्बल अर्धा तास वाहतूक रोखण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना हटवून वाहतूक मार्गस्थ केली मात्र नागरिकाकडून कर वसूल करणाऱ्या महापालिका तसेच पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या कोणत्याही अधिकार्यांनी आंदोलन स्थळी येण्याचे सौजन्य देखील दाखविले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या परिसरात सात ते आठ हजार नागरिक राहतात या ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. पालिका, एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही ,प्रशासन तीव्र आंदोलनाचा वाट पाहतेय का ,? ठाणे जिल्ह्याचे यंदा मुख्यमंत्री झालेत त्यांनी ही समस्या तातडीने लक्ष घालून मार्गी लावावी, नागरिक पाण्यासाठी रडतोय, आंदोलन केल तर पोलिस कारवाई करतात, पाणी समस्या मार्गी लागली नाही तर पाच ते सहा हजार नागरिक आंदोलन करतील मग आम्ही जेलला गेलो तरी चालेल तिकडे आम्हाला पाणी पाजा असा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी यावेळी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget