एक्स्प्लोर

Kalyan news : ठाकरे गटातील जिल्हा प्रमुखाला शिंदे गटाचा मदतीचा हात

Kalyan news : ठाकरे गटातील जिल्हा प्रमुखाला तडीपारच्या नोटिसनंतर आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट

Kalyan : गेल्या तीन महिन्यापासून शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष संपूर्ण राज्य पाहत आहे.  दोन्ही गटाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र कल्याण त्याला अपवाद ठरलं आहे. ठाकरे गटातील पदाधिकार्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा पुढे केला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर व माजी नगरसेवक हे त्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. आमदार भोईर यांनी डीसीपीची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला होता, त्यावेळी देखील शिंदे गटाकडून डीसीपी गुंजाळ यांची भेट घेत हललेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास  मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे.

पोलिसात हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर शिंदे गटातील माजी नगरसेवक रवी पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, श्रेयस समेळ नगरसेवकांसोबत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. या वेळी विश्वनाथ भोईर यांनी  विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. विजय साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर विजय साळवी यांच्यावर कारवाई करण्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही की कोणताही आकस नाही. तसेच अशा कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात वेळ नसल्याचेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. विश्वनाथ भोईर यांच्या या पाऊलामुळे राजकीय वर्तुळात  एकच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या नेत्यावर आरोप करताना विचार करुन बोला, शिंदे साहेबांचं लोकांच्या मनावरचं स्थान कमी होणार नाही : नरेश म्हस्के 
मोठ्या नेत्यावर आरोप करताना विचार करुन बोला, शिंदे साहेबांचं लोकांच्या मनावरचं स्थान कमी होणार नाही : नरेश म्हस्के 
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Thane Crime Sharmila Pimpalolkar: ठाण्याच्या महापौरांच्या ड्रायव्हरची मुजोरी, पार्किंगच्या वादातून एबीपी माझाच्या कॅमेरामनला मारहाण, VIDEO
ठाण्याच्या महापौरांच्या ड्रायव्हरची मुजोरी, पार्किंगच्या वादातून एबीपी माझाच्या कॅमेरामनला मारहाण, VIDEO
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Embed widget