Kalyan News :  कल्याणातील वरिष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे 27 जानेवारी रोजी निधन झाले. ब्रेन हॅमरेज या आजारासाठी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तात्काळ 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.परंतु दुर्दैवाने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच स्वदेश मालवीय यांची प्राणज्योत मालवली होती. 


आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज मालवीय कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.तसेच जाहीर केलेली 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली. स्वदेश मालवीय यांच्या मोठ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही आपण करणार असल्याचे आमदार भोईर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी स्वदेश मालवीय यांचे इतर कुटुंब सदस्य आणि कल्याणमधील विविध पत्रकार बांधवही उपस्थित होते. 


कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) मधील ज्येष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे शुक्रवार 27 जानेवारी रोजी मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. तीन दिवसापूर्वी रात्री त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना मध्यरात्रीच महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी तिथे आयसीयूची सुविधा नसल्यामुळे त्यांना कळवा अथवा मुंबईला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅम्ब्रेज झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे. 


मालवीय यांनी गेली 35 वर्ष पत्रकारिता केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताच त्यांनी पत्रकारिता सुरु केली होती.सुरुवातीच्या काळात हिंदीतील जनसत्ता या वृत्तपत्रात त्यांनी बरीच वर्षे काम केले. 


महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वदेश मालविय यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांसाठी आणि वृत्तवाहिन्यांसाठी पत्रकार म्हणून काम केलं. त्यामध्ये त्यांनी हिंदीतील जनसत्ता या वृत्तपत्रात सुरुवातील बरीच वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी एनडीटीव्हीचे प्रतिनिधी म्हणून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, ठाणे या भागाकरीता काम पाहिलं. हे झाल्यानंतर त्यांनी स्वत:चे वेब पोर्टल देखील सुरु केले होते. अशी एकूण 35 वर्षे त्यांनी पत्रकारिता या क्षेत्रात काम केलं.