Bhiwandi Crime News :  दोन  दिवसांपासून बेपत्ता असलेल्या  चार वर्षीय चिमुरड्याचा तो राहत असलेल्या  इमारतीतील पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी  शहरातील वाजा मोहल्ल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील इमारतीमध्ये घडली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी (Bhiwandi Police) आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. विद्यांश  गोपाल चव्हाण (4 वर्ष) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. 


भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक,  महादेव कुंभार यांनी सांगितले की, मृतक  विद्यांश  गोपाल चव्हाण हा अल्पवीयन मुलगा भिवंडी  शहरातील वाजा मोहल्ल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील इमारतीमध्ये  आई वडिलांसह आजी-आजोबा यांच्यासोबत राहत होता. तो शुक्रवारी 26 जानेवारी रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर गेला होता.परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर विद्यांशच्या आईच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विकिन्याशचा शोध सुरू केला होता. 


दरम्यान रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला. भिवंडी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला. तर या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले की, घटनास्थळी इमारतीच्या तळ मजल्यावर पाण्याच्या टाकीचे झाकण अर्धे उघडे असल्याने बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यासह मृतक चिमुरड्यासोबत  काही घातपात घडला का? या घटनेचाही   तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.


हुंड्यासाठी पतीकडून नवविवाहितेची निर्घृण हत्या


समाजात हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शासन दरबारी या संबंधित कठोर कायदा असून देखील आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना वाशिमच्या (Washim) वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी (Dowery) तिच्याच पतीने गळा चिरून हत्या(Crime) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.


काही महिन्याअगोदर चिखली बु. गावातील मेघा शिंदे (Megha Shinde) या तरुणीचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे (Gajanan Shinde) या तरुणाशी झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला. तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यानंतर मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला. मेघा ही आपल्या पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथ पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघाची गळा चिरत हत्या केल्याची माहिती आहे.