कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) मधील ज्येष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे शुक्रवार 27 जानेवारी रोजी मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. उपचारादम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती समोर आलीये.ब्रेन हॅम्ब्रेज झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे. मालवीय यांनी गेली 35 वर्ष पत्रकारिता केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताच त्यांनी पत्रकारिता सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात हिंदीतील जनसत्ता या वृत्तपत्रात त्यांनी बरीच वर्षे काम केले.
स्वदेश मालवीय यांनी एनडीटीव्हीचे प्रतिनिधी म्हणून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, ठाणे या भागाकरीता काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे डेली टच हे वेब पोर्टल सुरु केले होते. याशिवाय ते पीटीआय डिजिटलसाठी काम करीत होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. तीन दिवसापूर्वी रात्री त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना मध्यरात्रीच महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी तिथे आयसीयूची सुविधा नसल्यामुळे त्यांना कळवा अथवा मुंबईला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्वदेश मालविय यांची पत्रकारितेची कारकिर्द
महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वदेश मालविय यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांसाठी आणि वृत्तवाहिन्यांसाठी पत्रकार म्हणून काम केलं. त्यामध्ये त्यांनी हिंदीतील जनसत्ता या वृत्तपत्रात सुरुवातील बरीच वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी एनडीटीव्हीचे प्रतिनिधी म्हणून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, ठाणे या भागाकरीता काम पाहिलं. हे झाल्यानंतर त्यांनी स्वत:चे वेब पोर्टल देखील सुरु केले होते. अशी एकूण 35 वर्षे त्यांनी पत्रकारिता या क्षेत्रात काम केलं.
ही बातमी वाचा :
Bhandara News : भंडाऱ्याच्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीत भीषण आग; कोट्यवधींचं साहित्य आगीत जळून खाक