भिवंडी: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ असून राज्य सरकार दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलीये. जी गोष्ट सरकारच्या हातातच नाही, ती गोष्ट करण्याचे आश्वासन राज्य सरकारने का दिले असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केलाय. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान वाद लावण्याचे काम राज्य सरकारने केले. दंगे केल्याशिवाय राज्य सरकारला मतं मिळणार नाहीत. तीन वर्षात सरकार एकमेकांची मर्जी सांभाळत आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत. 


मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. महायुतीमधील एकाही पक्षाच्या मंत्र्यांने किंवा खासदाराने संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला नाही. राज्यातील परिस्थिती तणावग्रस्त करण्याची जबबादारी देखील राज्य सरकारवरच असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्य सरकारच्या पटलावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीये. 


मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर


दरम्यान अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला. मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशी येथे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांचा अध्यादेश आजच काढण्याची मागणी केलीये. जर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हा अध्यादेश काढला नाही, तर आम्ही मुंबईत धडकणार असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 



  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या 

  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा 

  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा 

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या 

  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही


हेही वाचा :


Manoj Jarange : अध्यादेश निघाला तर पोलिसांचा मान ठेवून पुढं जाणं टाळीनही, पण जर नाही आले तर... पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मनोज जरांगेंनी स्पष्टचं सांगितलं