ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये (Mumbra Kalwa Assembly Election) शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कळव्यातील विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रिटा यादव, रुपाली गोटे, आशरीन राऊत, हफिजा नाईक, अन्सारी साजिया परवीन सर्फराज, माजी नगरसेवक शेख जफर नोमानी यांच्यासह अनेकांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित होते.
राष्ट्रवादीत कुणा-कुणाचा प्रवेश?
- कळव्यातील विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक प्रकाश बर्डे
- नगरसेविका रिटा यादव
- परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर
- राजनाथ यादव आणि
- नगरसेविका रुपाली गोटे
- नगरसेविका आशरीन राऊत
- समाजसेवक इब्राहिम राऊत
- नगरसेवक शेख जफर नोमानी
- नगरसेविका हफिजा नाईक
- समाजसेविका नेहा नाईक
- समाजसेवक काफील शेख
- नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज
- राजू अन्सारी
- सर्फराज अन्सारी
- नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख
- अजीज शेख
- मुमताज शाह
- मेहफूज (मामा) शेख
- सय्यद शमविल
यावेळी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्तेपदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्षपदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदीनियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा-कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी वाचा: