Bhiwandi Accident News : भिवंडी (Bhiwandi) शहरालगत असलेल्या मानकोली अंजुर फाटा चिंचोटी रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही या महामार्गावर शासकीय यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच टोल कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मानकोली अंजुर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई येथून अवजड वहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अशाच एका वाहनाचा आज दुपारच्या सुमारास मोठा अपघात (Accident) झाला आहे. यात वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक ट्रक चक्क पलटी झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, हा महामार्गावरील खड्ड्यांची दुरावस्था नव्याने समोर आली आहे. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष
मागील काही दिवसांपासून मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ पोलीस कॅम्पातील रस्त्यांवर देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. लाखो मुंबईकरांची सुरक्षा पाहणाऱ्या मरोळ पोलीस कॅम्पात राहणाऱ्या शेकडो पोलीस कुटुंबांना या खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. पोलीस कुटुंबीयांची शाळकरी मुले, वृद्ध आई-वडील आणि गरोदर महिलांना या खड्ड्यातून वाहने घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाय या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी चालकाचे अपघात देखील झाले आहे. या खड्ड्यांविषयी पोलीस कुटुंबीयांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार देखील करण्यात आली. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पोलीस कुटुंबीयांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
नागपूर ते पिपळखुटी राष्ट्रीय महामार्गावर रस्ताची दुरवस्था, खडे बुजता बुजेना
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच वडकी ते पिपळखुटी या परिसरातुन जाणाऱ्या नागपूर-हैदराबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. दुचाकीचालक, प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. तेलंगणा सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर केळापूर या ठिकाणी लाखो रुपयाची टोल वसुली केली जाते, मात्र तरीही महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या कंपनीकडून खड्डे बुजवले जात नसल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वडनेर ते पिपळखुटी या महामार्ग परिसरातील देखभाल-दुरुस्तीसाठी निधी वर्षभरासाठी देण्यात आला. मात्र खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले कंपनीने खडे बुजविणे महामार्गा व झाडाचा देखभाली नावावर निधी आपल्या खिशात टाकल्याचे दिसुन येत आहे. महामार्ग दुरुस्ती कंत्राटदार फक्त खड्ड्यात डांबरच्या नावावर गिट्टी टाकतात. ती लगेचच दुसऱ्या दिवशी पाऊस, वाहनांच्या टायरमुळ निघून जाते. याकरिता रेडीमिक्स अथवा आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे खड्डे कायमस्वरूपी भरले गेले पाहिजेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे
इतर महत्वाच्या बातम्या