एक्स्प्लोर

Thane Politics : टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Thane Amazon Data Center Scam: ठाण्यात टीडीआर घोटाळ्यानंतर आता 'ॲमेझॉन मेगा डेटा सेंटर'वरून नवा वाद पेटला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांच्या पाण्याचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेत (TMC) सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यामुळे (TDR Scam) वनविभागासह पालिकेची नाचक्की होत असतानाच, आता पालिकेचा आणखी एक नवा कथित प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ॲमेझॉनचा (Amazon) मेगा डेटा सेंटर प्रकल्प ठाण्यात उभारण्याचा घाट घातला जात आहे, असा खळबळजनक आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे.

या डेटा सेंटरमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात केवळ 60 जणांना रोजगार मिळणार असून त्याबदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे, असा दावा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.

Thane Water Crisis : ठाणेकरांच्या हक्काचे 12 MLD पाणी डेटा सेंटरच्या घशात?

ठाणे शहरात सध्या जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वतः अर्थसंकल्पात शहराला आधीच 30 एम.एल.डी. (MLD) पाणी कमी पडत असल्याची कबुली दिली आहे. असे असताना तहानलेल्या ठाणेकरांच्या हक्काचे तब्बल 12 एम.एल.डी. पाणी या ॲमेझॉन डेटा सेंटरच्या घशात ओतले जाणार आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. 

या प्रकल्पामुळे पाण्याचा अपव्यय तर होईलच, पण सोबतीला अमर्याद विजेचा वापर आणि दिवस-रात्र होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा (Noise Pollution) मोठा जाच ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे, असंही आव्हाड म्हणाले. 

या विनाशकारी डेटा सेंटरला आमचा तीव्र विरोध आहे आणि राहील. आम्ही पालिकेच्या सभागृहात तर याविरोधात आवाज उठवूच, पण जनतेच्या दारात जाऊनही या घोटाळ्याविरोधात उग्र आंदोलन छेडू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तसेच, ॲमेझॉनच्या डेटा सेंटरशेजारीच संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घरे बांधावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Environmental Damage : 'ठाणेकरांच्या मुळावर उठलेला प्रकल्प'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही या प्रकल्पावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरले. ठाणेकरांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प हवाच कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

हा डेटा सेंटर प्रकल्प ठाणेकरांच्या पूर्णपणे मुळावर उठला असून, यामुळे शहराचे पर्यावरणीय नुकसान (Environmental Damage) मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या अन्यायाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून तर संघर्ष करूच, पण त्याचसोबत न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाही देऊ, असा निर्धार प्रधान यांनी व्यक्त केला.

या नव्या आरोपामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, टीडीआर घोटाळ्यानंतर आता 'डेटा सेंटर'चा मुद्दा पालिकेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसत आहे.

ही बातमी वाचा: 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget