H3N2 Thane News : ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. अशाचतच करोना आणि ‘एच 3 एन 2’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. आठवडाभरात ठाण्यात करोनामुळे मृत्यूची झालेल्याची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे शहराची आरोग्यचिंता वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वृत्तास ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे. दोन्ही विषाणूची एकत्र लागण झाल्यमुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेय.

  


ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात करोना सक्रीय रुग्णांची संख्या 306 इतकी झाली आहे. त्यापैकी 206 रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर, कल्याण-डोंबिवली शहरात 25, नवी मुंबई शहरात 28 , उल्हासनगर शहरात 3, भिवंडी शहरात 18, मिरा-भाईंदर शहरात 10 आणि ग्रामीण भागात 16 इतके सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण संख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या आठ दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झालेला असून त्यापाठोपाठ मंगळवारी आणखी एका 19 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याथी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे ‘एच 3 एन 2’चा पहिला मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच  एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढले असून या आजाराचे आतापर्यंत 19 रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी या आजारामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.


ठाणे शहरात इन्फ्ल्युएंझाचे 19 रुग्ण...


 ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच 'एच 3 एन 2' इन्फ्ल्युएंझा या संसर्गजन्य विषाणूने डोके वर काढले असून, याचे आत्तापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी यामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या दहा  दिवसांत एका वृद्धाचा मृत्यू झालेला असून, त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याधी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना 'एच 3 एन 2' इन्फ्ल्यूएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे आठवडाभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर एच 3 एन 2'चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.


तज्ज्ञ काय म्हणतात ?


'H3N2 आणि COVID-19 हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत.  ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह प्रत्येक विषाणूची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत होऊ शकतो. जसे की न्यूमोनिया किंवा तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (ARDS). हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सह-संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही विषाणूंविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय करणे, जसे की कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा साठी लसीकरण हेच होय, असे नवी मुंबईतील अपोल हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्त्र आणि सल्लागार डॉ लक्ष्मण जेसानी यांनी सांगितले.