ठाणे : इमारतीचा पत्रा पडून ठाण्यात मोठी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत 8 मुलं गंभीर जखमी झाली आहे. इमारतीचा पत्रा फुटबॉल टर्फवर पडल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ही घटना समोर आली आहे. पत्रा पडून मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. ठाण्यातील गावंड बाग परिसरात एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल टर्फवर पडल्यामुळे त्या ठिकाणी खेळत असलेले आठ मुलं जखमी झाले.


इमारतीचा पत्रा पडून मोठी दुर्घटना


गावंड बाग परिसरातील फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते. यावेळी त्यांच्यावर इमारतीचा पत्रा पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना ठाण्यातील  बेथनी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


पत्रा पडून आठ जण गंभीर जखमी


प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, फुटबॉल टर्फवर सर्व मुलं खेळत होती. लहान-मोठी सर्व मुलं खेळत होती. लहान मुलांना घरी पाठवण्यात आलं, त्यानंतर मोठी मुलं फुटबॉल खेळत होती. जोरदार पाऊस सुरु झाला, त्यासोबत सोसोट्याचा वारा सुरु झाला. जोरदार वाऱ्यामुळे बिल्डिंगवरचा पत्रा खाली कोसळला. पत्रा टर्फवर कोसळल्यामुळे आठ जणांना दुखापत झाली, त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही समोर आली आहे. 


फुटबॉल टर्फवर कोसळला इमारतीचा पत्रा


ठाणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसासह वादळी वाराही पाहायला मिळत आहे. यातच वाऱ्यामुळे पत्रा उडून थेट फुटबॉल टर्फवर कोसळून ही घटना घडली आहे. स्थानिक फुटबॉलपटूने दिलेल्या माहितीनुसार, या टर्फवर कोचिंगसुद्धा चालते. कोच इथे मुलांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मुलं फुलबॉल खेळण्यासाठी येत असतात.


पाहा व्हिडीओ : फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांवर कोसळलं पत्र्याचं शेड, ठाण्यात 8 जखमी (Thane Shed Collapse on Turf)



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


बेपत्ता आजींचा मृतदेह सापडला; दोन दिवसांपासून झाडाखाली दबल्या, पण कुणालाच थांगपत्ता नाही