Dombivli blast news : डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-2 मधील कंपनीत ब्लास्ट

Dombivli blast News Live Updates: मुंबईजवळची डोंबिवली MIDC पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. या स्फोटाचे प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 May 2024 12:04 PM
डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा?

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. कालपर्यंत ही दुर्घटना केमिकल कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे (Dombivli Blast) घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत एक नवीन माहिती दिली. आम्ही सकाळी या कंपनीत सर्वेक्षण केले. त्यावेळी अमुदान कंपनीत बॉयलर अस्तित्त्वातच नसल्याचे दिसून आले. हा जो स्फोट झाला आहे तो बॉयलर नव्हे तर रिअॅक्टरमुळे झाल्याचे दिसत आहे. आम्हाला रिअॅक्टरचा पाया आणि काही तुकडे याठिकाणी दिसून आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सविस्तर वाचा.

Dombivli Blast: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एमआयडीसी स्फोट दुर्घटनेच्या पाहणीसाठी डोंबिवलीत

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांची संघटना "कामा" संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली . यावेळी दानवे यांनी उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतले तर सुरक्षिततेबाबत त्यांना सूचना देखील केल्या . या ठिकाणाहून अंबादास दानवे जखमींची भेट घेण्यासाठी एम हॉस्पिटल येथे गेले आहेत

डोंबिवलीत MIDC मध्ये भयावह दृश्य

केमिकलच्या वाफेमुळे हवेत दुर्गंधी, उद्ध्वस्त ढिगाऱ्यांच्या बाजूला मृतदेहांचे तुकडे, डोंबिवली MIDC मधील भीषण दृश्य. सविस्तर वाचा.

Dombivili Blast :  डोंबिवलीत अनेक दुकानं आणि हॉटेल्सचंही मोठं नुकसान

Dombivili Blast :  डोंबिवलीतील स्फोट इतका भीषण होता की त्यामुळं आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. आसपासच्या परिसरातील अनेक घरांचं नुकसान झालंच, पण दुकानं आणि हॉटेल्सचंही मोठं नुकसान झालं. या कंपनीच्या काही अंतरावर असलेल्या यादव ग्लास या काचेच्या दुकानातही हादरे बसलेत. त्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आता हाती आलंय. दुर्घटनास्थळाजवळील साईमंदिर आणि एका हॉटेलचंही खूप नुकसान झालं. 

Dombivili Death Toll Rise : डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 11 वर

Dombivili Death Toll Rise :  डोंबिवली एमआयडीसीत काल झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झालाय. काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज सकाळी आणखी तीन मृतदेह सापडले. त्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचं पथक दुर्घटनास्थळी असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरु आहे.  (वाचा सविस्तर) 

Dombivli Blast : डोंबिवली स्फोटाप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

Dombivli Blast : डोंबिवली स्फोटाप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dombivli blast news : डोंबिवली स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. 

Dombivli blast news : स्फोटामुळे नुकसान झालं, भरपाई कोण देणार? डोंबिवलीकरांचा सवाल

डोंबिबलीत झालेल्या स्फोटात अनेक घरांचं नुकसान, आता नुकसान भरपाई कोण देणार, स्थानिक नागरिकांचा सवाल. तर अनेक वेळा केमिकल कंपनीविरोधात तक्रारी देऊनही कारवाई केली जात नाही, नागरिकांचा आरोप.

Dombivli Blast update : डोंबिवली अपघातात आतापर्यंत 6 कामगारांचा मृत्यू

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. मात्र, येथील भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत 6  कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


 


 

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

डोंबिवली अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आलेली आहे. मात्र, आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून अग्नीशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे. 

Dombivli Midc Blast : डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट

Dombivli Midc Blast : अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनी जवळ, एम.आय.डी.सी. फेज-02 मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी 5 ते सहा कर्मचारी जखमी झाली आहे.  स्फोटामुळे अनेक वाहनांचे व अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक  आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Devendra Fadnavis On Dombivli Blast  :  डोंबिवलीची घटना अतिशय दु:खद, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis On Dombivli Blast  :  डोंबिवलीच्या स्फोटावर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


 





अग्निशमन दलाला आत शिरता आलेले नाही: माजी नगरसेवक मंदार हळबे

Dombivli Blast Today : थोड्यावेळापूर्वी स्फोट झाला आहे. लांबच्या अंतरापर्यंत धूर पसरला आहे. आम्ही साधारण 20-25 जखमी लोकांना धावताना पाहिले आहे. अजूनही कंपनीत ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. कंपनीतून सध्या धुराचे प्रचंड लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आतमध्ये जाणे शक्य होत नसल्याचे मंदार हळबे यांनी सांगितले.  

Dombivli Explosion: डोंबिवल परिसरात धुराचे मोठे लोट, बॉयलरमध्ये स्फोट

Dombivli Explosion: डोंबिवलीत आग धुमसतीच आहे.  परिसरात धुराचे मोठे लोट, बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची महिती  समोर आली आङे. 

Dombivli Midc Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसी स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

Dombivli Midc Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसी स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती आहे.  काही किमी दूरपर्यंतच्या इमारतींना कंपनं जाणवली.   अनेकांचं नुकसान झाली आहे. 

Dombivli:  डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली

Dombivli:  डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली आहे.  एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट झाला आहे.   5 ते 6 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  

पार्श्वभूमी

Dombivli blast news : मुंबईजवळची डोंबिवली MIDC पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला.  या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. इतकंच नाही तर या स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोट झाला ती केमिकल कंपनी आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.