ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या सेंट्रल पार्कचे लोकार्पण गुरूवार, 08 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. एका बाजूला उल्हास नदीचे खाडीपात्र आणि निसर्गसौंदर्याने भरलेला संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, यांच्यामध्ये वसलेल्या ठाण्याच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारा तब्बल 20.5 एकरवर (82890 चौरस मीटर) पसरलेला भव्य ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेकरांसाठी आता खुले होत आहे.


तब्बल 3500 पेक्षा विविध प्रकारची झाडे या सेंट्रल पार्कमध्ये असून वर्षाला 8,84,000 लाख पौंड ऑक्सिजननिर्मिती या पार्कमधील वनराईतून होणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील सेंट्रल पार्क ठाण्यासाठी उपयोगी ठरेल.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी त्यांच्या संकल्पनेतून हरीत आणि स्वच्छ ठाण्याची कल्पना मांडलेली आहे. याबरोबर मुलांना अंगणात, सभोवताली झाडे, रोपे लावून अंगणातील परसबाग देखील विकसीत करण्याचे आवाहन केलेले आहे. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने या ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क हे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावणार आहे.


ठाण्यात कोलशेत येथील कल्पतरू पार्कसिटीमध्ये 20.5 एकरवर (82890 चौरस मीटर) जागेवर ग्रँड सेंट्रल पार्क साकारले गेले आहे. विविध प्रकारची 3500 हून अधिक रोपे, फुल झाडे या पार्कमध्ये असून लहान मुलांपासून तरूण, जेष्ट सर्वांसाठी पार्कमध्ये फिरण्याची सोय आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण ठरेल यात शंका नाही. 


मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जेष्ठाना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट देखील पार्कमध्ये आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील स्वतंत्र सोय येथे आहे. येथे असलेल्या पाणवठ्यावर अनेक पक्षी येत असतात. त्यांचा किलबिलाट एकताना मनावरील शीण सहज दूर होईल. एक मोठे ओपन एम्पीथिएटर देखील येथे आहे, जेथे नैसर्गिक वातावरणात आपले मनोरंजन होऊ शकेल. 


पार्कमध्ये फिरताना भूक लागली तर, कॅफेटेरीया, शौचालय यांची देखील सोय करण्यात आली आहे. एकूण पार्कचा परिसर पाहताना भविष्यात येथे अनेक शाळांच्या सहली , पर्यावरणविषयक सहली आयोजित करता येऊ शकतील. 20.5 एकरवर (82890 चौरस मीटर) जागेवर वसवलेल्या या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे, वृक्ष याना धक्का न बसवता त्यांचाही वापर पार्कमध्ये करून हे उद्यान फुलवण्यात आले आहे. 


एका पुरातन वटवृक्षाच्या सावलीत उभारलेले ट्री गार्डन तर बच्चे कंपनीसाठी खेळण्याची फेवरेट डेस्टीनेशन असेल. अनेक फुलझाडे येथे असल्याने फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती या उद्यानात आनंदाने बागडताना दिसतील. हा सेंट्रल पार्क न्यूयार्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क व लंडनच्या हाईड पार्कच्या तसेच शिकागोच्या मिलएननियम उद्यानाच्या संकल्पनेवर आधारीत केला असल्याने शहराच्या मध्ये एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगलच उभे राहिलेले आहे. 


ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांअंतर्गत विकसीत करून घेतलेल्या या ग्रँड सेट्रल पार्कमुळे ठाण्याच्या लौकिकात एक नवीन भर पडली आहे. इतिहासाने समृध्द असलेल्या ठाणे नगरीच्या पर्यटनात ग्रँड सेंट्रल पार्क नवीन पर्यटन स्थळ म्हणून भर पडली आहे.  


ग्रँड सेंट्रल पार्कची वैशिष्ट्ये


· 20.5 एकरवर (82890 चौरस मीटर) पार्कवरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान


· प्रतिष्ठित न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा


· 3500 पेक्षा जास्त झाडे आणि वनस्पतींपासून दरवर्षी 8,84,000 लाख पौंड ऑक्सिजन तयार करणे


· जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविध


· हे उद्यान हिरवे अभयारण्य म्हणून काम करते, पक्षी आणि फुलपाखरांच्या 100 पेक्षा जास्त प्रजातींचे होस्ट करते, जैवविविधता संवर्धनाला प्रोत्साहन देते


· मोरोक्कन, चायनीज, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित थीम गार्डन्स सांस्कृतिक समृद्धी आणि सौंदर्यात्मक विविधता जोडतात


· सर्वात मोठी खुली आणि हिरवीगार जागा


· सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध मनोरंजनाच्या संधी प्रदान करते


· आकर्षणांमध्ये एक ट्रीहाऊस, 3-एकरांचे विस्तीर्ण तलाव आणि भारतातील सर्वात मोठ्या स्केटिंग पार्क उद्यानांत यांचा समावेश झाला आहे, जे पार्कचे आकर्षण आणि मनोरंजन वाढवेल. 


ही बातमी वाचा: