भिवंडी : शहापूर नगर पंचायत हद्दीत  राज्य सरकारच्या निधीतून 30 लाखांच्या निधीतून कमान उभारण्यात आली आहे. मात्र स्थानिक भाजप (BJP) नगरसेवकांनी मनमानी करभार करीत त्याला स्वतःचे नाव दिलाचा आरोप शिंदे गटाकडून (Shinde Group) करण्यात आलाय.  शिवसेना शिंदे गटाच्या मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमखांनी हा आरोप केलाय. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आजपासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. तसेच भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हा प्रमुखाचे आरोप फेटाळत उपोषणच बेकायदा असल्याचं म्हटलं. त्यामुळे  कमानीच्या नामकरणाचा वाद  आणखीच पेटणार असल्याचं चित्र भिवंडीत पाहायला मिळतंय. . 


ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगर पंचायत समितीत (शिवसेना) शिंदे गटाची सत्ता आहे. तर राज्यात भाजप शिंदे सरकार सत्तेत आहे.  मात्र  ठाणे जिल्ह्यात विविध शहरासह ग्रामीण भागातील  दोन्ही गटाच्या नेत्यामध्ये अनेकदा राजकीय वादासह श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच,  शहापूर नगर पंचायत समितीमधील प्रभाग क्र. 7 चे भाजपचे नगरसेवक हरेश पष्टे आणि शिंदे गट शिवसेनेच्या  मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांच्यामध्ये 30 लाखांचा राज्य सरकराचा निधी खर्च करून उभारलेल्या कमानीच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला.


विशेष म्हणजे या कमानीला कोणाचे नाव देण्यात यावे असा  ठराव  नगसेवकांच्या बैठकीत अद्यापही मंजुर करण्यात आला नाही. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कमानीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र त्यापूर्वीच या कमानीला दिवंगत भगवान गायकवाड यांचे नाव देण्यासाठी 2021 साली जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. तर नगरसेवक पष्टे यांनी राज्य सरकराच्या नगरविकास विभागाकडे  केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर करून कमान उभल्याचं म्हटलं जात आहे. 


दरम्यान  शिवसेना मागासर्गीय  जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांनी कमानीच्या नामकरणाला विरोध केल्याने त्यांच्यावर नगरपंचायत प्रशासनाकडून त्यांनी लावलेले फलक काढून टाकल्याचे नगरसेवक पष्टे यांनी सांगितले. मात्र जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांनी माझ्यावर कमानीच्या कामावर अडथळा निर्माण केल्याचा खोटा गुन्हा नगरसेवकाने दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर आमरण उपोषणाची हाक दिली. पण हे उपोषणच बेकायदेशीर असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच  कमान उभारली असून येत्या नगरपंचायत मधील नगरसेवकांच्या बैठकीत कमानीला नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.  जर नामकरणाचा ठरावच झाला नाही यामुळे माझ्या विरोधातील उपोषण बेकायदेशीर असल्याचं भाजपचे नगरसेवर पष्टे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हा वाद मिटवला नाही तर हा वाद आणखीनच चिघळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


मात्र कायदेशीर प्रक्रियापूर्ण करून कमान उभारली असून येत्या नगरपंचायत मधील नगरसेवकांच्या बैठकीत कमानीला नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगत जर नामकरणाचा ठरावच झाला नाही यामुळे माझ्या विरोधातील उपोषण बेकायदेशीर असल्याचे सांगितले.  त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यतील बड्या नेत्यांनी जर वाद मिटवला नाही तर नामकरणाचा वाद अधिक चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.   


हेही वाचा : 


Pankaja Munde Video : जालन्याच्या ओबीसी मेळाव्याला जाण्यास माझ्या पक्षाने परवानगी दिली नाही, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य