Bhiwandi News : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) गोवर रुबेला आजाराचे (Measles Disease) 271 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 109 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यासाठी परेल येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट, मुंबई येथे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 44 रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर गोवर रुबेलामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. सकिना (6 महिने) फातिमा (14 महिने) अशी मृत बालकांची नावं आहेत.  


गोवर आणि रुबेलाचे रुग्ण असलेल्या बाधीत क्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. संशयीत रुग्णांना 'व्हिटॅमिन ए'चा पहिला डोस आणि 24 तासांनी दुसरा डोस देण्यात आला. तसेच, 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर, रुबेलाचा डोस घेतलेला नाही, अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेलाचा डोस दिला जात आहे. 


गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नाही, असं सर्वेक्षणात निदर्शनास आलं आहे. सदर ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता, गोवर रुबेला आजारावर नियंत्रण, उपाययोजना आणि विचार विनिमय करण्साठी खाजगी बालरोग तज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु मौलाना यांची बैठक घेण्यात येत आहे. 


दरम्यान, गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प्स सुरु आहेत. काही प्रमाणात लसीकरणाविषयीची उदासीनता आणि विरोध देखील दिसून येतो. अशा वेळी मौलवींची मदत घेत नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे.  


गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? 


सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Measles Disease : गोवर हा संसर्ग नेमका काय आहे? गोवर संसर्गाची लक्षणे आणि उपचार कोणते? वाचा तज्ज्ञांचं मत