मुंबई : मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भिवंडीतील वरिष्ठ डॉक्टरांच्या SUV ला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील मंडई भागातील आचार्य हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ डॉक्टर अतुल आचार्य हे आपल्या पत्नी डॉ. तन्वी आचार्य, मेहुणी आणि चार मित्रांसह तीर्थयात्रेसाठी 10 दिवसांपूर्वी निघाले होते. रविवारी सकाळी उज्जैनकडे जात असताना गुना-शिवपुरी मार्गावर त्यांच्या SUV ला अपघात झाला.  दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने ते वाहन दरीत कोसळले.


या अपघातात डॉक्टर तन्वी आचार्य (50) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघातात डॉक्टर अतुल आचार्य (55, भिवंडी), उदय जोशी (64, दादर), सीमा जोशी (59, दादर) आणि सुबोध पंडित (62, वसई) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिवपुरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण आहे.


घरी परतताना काळाचा घाला, साताऱ्यातील दाम्पत्याचा मृत्यू


सांगलीतील (Sangli) कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव मधील दाम्पत्याचा मृत्यू झालाय. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी (ता. वाळवा) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते. गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी कडेपूरमार्गे खटाव येथे परतत होते. याचवेळी जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर-वांगीमार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता. 


ही बातमी वाचा: