ठाणे: बेजबाबदार कार चालकाने व्हिडीओ पाहण्याच्या धुंदीत कार रिव्हर्स घेतली आणि त्या कारच्या मागच्या चाकाखाली एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली होती. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला आहे. या कारचालकाचे नाव सद्दाम असल्याचे समोर आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे युसूफ या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या समसुल्लाह मंसूरी यांच्या मुलाचा निकाह सभारंभ 5 जून रोजी होता. या समारंभात सोसायटीच्या आवारात एकीकडे समारंभाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका बेजबाबदार कारचालकाने कारची काच लावून व्हिडीओ पाहत असतानाच कार मागे घेतली. या कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाची चिमुरडी कारच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली गेली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. आता या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात कार चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास सुरू केला आहे.
भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे यूसुफ इमारतीत या निकाह सभारंभाची तयारी सुरू होता आणि त्यासाठी सभारंभासाठी अनेक पाहुणे मंडळी आली होती. यामध्ये नालासोपाराहून मोहम्मद अकरम मंसूरी हे मृत बालिकेचे वडील परिवारसह सायंकाळी 7 च्या दरम्यान आले होते. त्यावेळी बागे यूसुफ इमारतीच्या आवारात असलेल्या हॉलमध्ये निकाहनंतर वलिमा सभारंभासाठी पाहुण्यांचा जमाव जमला होता.
त्याच सुमाराला फॉर्च्यूनर कारमध्ये दुसरे कुटूंब आले होते. हे कुटूंब कारमधून उतरले. त्यानंतर चालक कार घेऊन पार्किंगमध्ये उभी करण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याने कारच्या काचा लावून व्हिडीओ पाहतच कार रिव्हर्समध्ये घेतली. तो व्हिडीओ पाहण्यात गुंग असल्याने त्याचे लक्ष कारमागे खेळणाऱ्या मुलांवर नव्हते. अशातच अलिना कारच्या मागे खेळण्यात मग्न होती. त्याच वेळी अचानक चालकाने कार रिव्हर्स घेतली आणि अलिनाला जोरदार धडक दिल्याने ती फॉर्च्यूनर कारच्या मागील चाकाखाली येऊन ती चिरडली गेली.
त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिक चालकाला जोरजोरात आवाज देऊन कार थांबविण्यास सांगत होते. मात्र कार चालकाने कार थांबवली नाही आणि चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही बातमी वाचा: