ठाणे : ठाणे (Thane)  जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  याची निवड झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या तरी पालकमंत्री फिरकले नाही तेव्हच मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी पालकमंत्री यांना शोधून दिल्यास गावठी कोंबडा व वळघणीचे मासे  बक्षीस ठेवले आहेत.पालक मंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलंय वाऱ्यावर मुरबाडमध्ये लावलेल्या या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे . 


साहेब आपला पत्ता कुठेच लागत नाही,  आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही,  जिथे कुठे असाल तिथून परत या आम्ही तुमची वाट पाहतोय आपल्या जिल्ह्यात असंख्य समस्या आहेत. शरद पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौरे यांच्या बॅनर बाजीची चरच्या सध्ये मुरबाडमध्ये होत आहे.  चक्क कोंबडे आणि गाबोलीचे मासे बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले. 


ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज                                                                            


 जिल्ह्यासह तालुक्यातील भीषण पाणी टंचाई, रोजगार नसल्याने वाड्यापाड्यावरील कुपोषणाचा विळखा असो की नुकताच घडलेली  ओजिवले वाडीतील अदिवासी महिलेची प्रसुतीसाठी झोळीतील धिंड,  मुरबाड कल्याण रस्त्या वरील चिखलयुक्त जिवघेणा प्रवास  या शिवाय मुंबई - नाशिक मार्गावरील  भिवंडी बायपास ते ठाणे दोनदोन तासाचा वाहतूक खोंळबा  या जिल्हाबाबत  शिंदे सरकार अनभिज्ञ आहे.  शंभूराज देसाई  पालकमंत्री झाल्यापासून गेल्या दोन वर्षापासून ते मुरबाड  तालुक्यासह जिल्ह्यात न फिरकल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला.  


पालकमंत्री म्हणजे काय रं दादा म्हणायची वेळ जिल्ह्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांवर आल्याचा टोमणाही  दिपक वागचौडे यांनी शिंदे सरकारला लगावला. दरम्यान,  मुरबाड तालुक्याती शरद पवार राष्ट्रवादी  पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक वाकचौरे यांनी मुरबाड बस स्थानकासमोर  पालकमंत्री दाखवा आणि कोंबडा  मिळवा या बॅनरबाजीने एकच राजकीय चर्चा सुरू आहेचय या अनोख्या कल्पनेला नागरिक देखील दाद देत असल्याचे दिसून येत आहे.  तर दुसरीकडे बेकायदा ढाबा , बिअर बार , हुक्का पार्लर, यावर सध्या कारवाई सुरू आहे. मात्र या विषयी पालकमंत्री देसाई यांनी अद्यापही प्रसारमाध्यमासमोर आले नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी  शरद पवार गटाकडून करण्यात आला.