मिरा रोड- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिट १ ने अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवलं आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातून ३, तेलंगणातून ३, उत्तर रदेशातून ८ आणि गुजरातहून १ असे १५ आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे. तर त्यांच्याकडून ३२८ कोटीच एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ, कच्चे एम.डी. आणि एम.डी. बणवण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्यासोबतच ३ पिस्टल, १ रिवॉल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. आज एम.बी.व्ही.व्ही. पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 


१५ मे २०२४ रोजी क्राईम युनिट १ ला गुप्त बातमीतादाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम ठाणे घोडबंदर मार्गे मिरा भाईंदरमध्ये एम.डी.विक्री करण्यासाठी येत आहेत. त्याच अुनंषगाने क्राईम युनिट १ ने द्वारका हॉटेल येथे चेना गावाजवळ आरोपी शोएब हनीफ मेमन आणि निकोलस लिओफ्रेड टायटस यांना पकडलं असता. त्यांच्याजवळून २ कोटी किंमतीचे एम.डी. ड्रग्स मिळून आलं. दोघांच्याविरोधात एन.डी.पी.एस.कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपासात मोठं रॅकेट उध्दवस्त करण्यात क्राईम युनिटला यश आलं. 


आरोपी शोएबने दिलेल्या माहितीनुसार आरोपी दयानंद उर्फ दया माणिक मुद्दनार राहणार हैद्राबाद आणि नासीर उर्फ बाबा जानेमियॅा शेख यांना हैद्राबाद, तेलंगणा येथून या दोघांना अटक केली. यातील दयानंद उर्फ दया याची नरसापुर जिल्हा विकाराबाद तेलंगणा येथे एम.डी. बनविण्याची फॅक्टरी निघाली. त्या फॅक्टरीत पोलिसांनी छापा टाकून, तेथून २५ कोटींचे कच्चे एम.डी., केमिकल्स आणि एम.डी. बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. तोच धागा पकडत क्राईम युनिट १ ने तापासाची चक्रे वेगाने फिरवत गेली. 


कारमध्ये पोलिसांना १४ लाख ३८ हजार किंमतीचं एम.डी-


आरोपी दयाने दिलेल्या माहितीनुसार घनश्याम रामराज सरोज याला उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून ताब्यात घेतलं. त्याचबरोबर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन तेलंगणा येथे राहणाऱ्याला मुंबईच्या गोरेगाव येथून त्याच्या स्विफ्ट कारसह ताब्यात घेतलं. त्या कारमध्ये पोलिसांना १४ लाख ३८ हजार किंमतीचं एम.डी. ड्रग्स सापडलं. त्याचबरोबर दयाने आणखीन दिलेल्या माहितीनुसार,भरत उर्फ बाबू सिध्देश्वर जाधव याला भिवंडीच्या गणेशपूरी येथून अटक केली. तो राहत असलेल्या ठाण्यातील पडगा येथील लाप या गावी त्याच्या घरातून ५३,७१० रुपयाचे एम.डी. बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि केमिकल्स जप्त करण्यात आलं. 


१० लाख ८४ हजार रोख रक्कम जप्त-


पोलिसांना त्यानंतर ही तपासामध्ये एम.डी. बनवण्यासाठी लागणारे पैसे व एम.डी. विकून मिळालेले पैसे याची देवाण-घेवाण करणारा दाउदचा मुख्य हस्तक सलीम डोळा याची लिंक लागली. हाच सलीम दुबईहून भारतात एम.डी. ड्रग्सचे जाळं पसरवण्याचे काम करत असल्याचं निष्पन्न झालं. तोच धागा पकडत गुजरातच्या सुरत येथे राहणारा आरोपी झुल्फीकार उर्फ मुर्तुझा मोहसीन कोठारी याच्याकडे आरोपी सलीम डोळा याने पाठविलेले १० लाख ८४ हजार रोख रक्कम जप्त केली. तसेच काही रक्कम मुंबईच्या अंगडीया हवालामार्फत पाठवण्यात आल्याचं ही निष्पन्न झालं. यात मुंबईच्या भेंडी बाजार येथे राहणाऱ्या मुस्तफा युसुफभाई फर्निचरवाला आणि हुसैन मुस्तफा फर्निचरवाला यांच्याकडून ही ६ लाख ८० हजाराची सलीम डोळा याने पाठवलेली रक्कम जप्त केली. 


३ पिस्टल, १ रिवॉल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त-


तपासात क्राईम युनिटला अंमली पदार्थाचं कनेक्शन उत्तर प्रदेशात असल्याचं निष्पन्न झालं. उत्तर प्रदेशाच्या आजमगड येथून आरोपी सलीम डोळा आणि दया याचे साथीदार आरोपी अमिर तौफीक खान, त्याचा भाऊ बाबू तौफीक खान याचे साथिदार मोहम्मद नदीम शफिक खान, एहमद शाह फैसल शफीक आझमी यांना अटक करुन त्यांच्याकडून ३०० कोटी किंमतीचे १२ कच्चे एम.डी. चे ड्रम जप्त केले. याच गुन्हयातील अमिर तोफीक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान आणि अलोक विरेंद्र सिंह यांना उत्तर प्रदेशातील लखनउ येथून अटक केली. यातील आरोपी अमिर खान याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथे राहणार अभिषेक उर्फ शुभम नरेंद्रप्रताप सिंह याला १ जुलै रोजी नालासोपारा येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना ३ पिस्टल, १ रिवॉल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश आलं. आजपर्यंत सर्वात मोठी कारवाई एम.बी.व्ही.व्ही. पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिटने केली आहे. यात महाराष्ट्रातील ३, तेलंगणा हून ३, गुजरात हून १ आणि उत्तरप्रदेशातून ८ आरोपी अटक केले आहे. तर ३२७ कोटी ६९ लाख ४३ हजार ६० रुपये किंमतीचे एम.डी. अंमली पदार्थ, कच्चे एम.डी., एम.डी. बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्य, आणि ३ पिस्टल, १ रिवॉल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 


पोलीस आयुक्त काय म्हणाले?


या धडाकेबाज कामगिरीत क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उप निरीक्षख राजू तांबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे, पोलीस हवालदार, संजय शिंदे, संतोष लांगडे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, विजय गायगावाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधीर खोत, वाकास राजपुत, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, सनी सर्युवंशी, सौरभ इंगळे, गौरव बारी, धिरज मेंगाणे, मसुब किरण असवले आणि सायबर गुन्ह्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण या टिमनं खुप मेहनत घेतली. या गुन्ह्याचा तपास आता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे करत आहेत. (मधुकर पांडे, पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय)


संबंधित बातमी:


Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा