Thalapathy Vijay Female Student Controversy: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील थलपती विजय (Thalapathy Vijay) हे सगळ्यांना माहित आहे. थलपती विजयने नुकतच त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने घराबाहेर जमलेल्या सर्व चाहत्यांची भेट घेतली. त्याचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. पण सध्या तो एका वेगळ्या व्हिडीओमुळे बराच चर्चेत आलाय. 


विजयने काही दिवसांपूर्वीच राजकारणात एन्ट्री केली होती. त्यानंतर आता त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एक गोष्ट अशी घडली ज्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. तसेच यामुळे भर व्यासपीठावर या सुपरस्टारचा अपमान झाला असल्याचंही म्हटलं जातंय. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात. 


नेमकं काय घडलं?


अभिनेत्याने नुकतच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी मंचावर अनेक विद्यार्थी देखील उपस्थित होते. एका विद्यार्थीनीचा  सत्कार केल्यानंतर जेव्हा हा अभिनेता फोटोसाठी उभा राहिला, तेव्हा त्याने त्या मुलीचा खांद्यावर हात ठेवला. पण त्यावेळी अभिनेत्याला त्या मुलीने खांद्यावरुन हाथ काढण्याची विनंती केली. पण सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ पूर्ण नाही. कारण त्या विद्यार्थीनीने खांद्यावरचा हाथ काढून विजयचा हाथ तिच्या हातात घेतला. 










300 कोटी रुपये बजेट असलेल्या सिनेमा दिसणार विजय


विजयच्या वर्कफ्रंटविषयी बोलयाचं झालं तर, सध्या हा अभिनेता 300 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या The Greatest Of All Time या सिनेमावर काम करत आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अद्याप या सिनेमाचं काम पूर्ण झालेलं नाही.  


अभिनेता राजकारणातही सक्रिय


साऊथ स्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याने शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी आपला पक्ष देखील स्थापन केलाय. 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलय. 'तमिळगा वेत्री काझम' हा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणुक लढणार आहे.


ही बातमी वाचा :