एक्स्प्लोर
आता ओला कॅबमध्येही पैसे काढता येणार, येस बँकेचा उपक्रम
![आता ओला कॅबमध्येही पैसे काढता येणार, येस बँकेचा उपक्रम Yes Bank And Ola Tie Up You Can Get Cash In Ola Cabs आता ओला कॅबमध्येही पैसे काढता येणार, येस बँकेचा उपक्रम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/06175136/yes-ola-580x354.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नोटाबंदीनंतर सुरु असलेल्या चलनतुटवड्याच्या समस्येवर ओला कंपनीनं उपाय शोधला आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या येस बँकेसोबत हातमिळवणी करत ओलानं ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ओला कॅबच्या माध्यमातून येस बँक मायक्रो एटीएम सुविधा आपल्या ग्राहकांना देणार आहे. त्यामुळे लोकांना बँकेसमोरच्या रांगेत उभं राहण्याचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.
येस बँक आणि ओला कॅबनं सुरु केलेल्या या सेवेतून कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला 2000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. कालपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यात पीओएस मशिनच्या माध्यमातून ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम सहजपणे काढता येणार आहे.
येस बँक आणि ओलाच्या या उपक्रमाअंतर्गत देशभरातील 10 शहरांमध्ये एटीएम मशिन्स लावली जाणार आहेत. या मशिन्समधून 2000 रुपयेच काढता येणार असल्याची माहिती येस बँकेचे भारतातील प्रमुख रजत मेहता यांनी दिली आहे. ओला कॅबमध्येच पीओएस मशिन्स लावली जाणार आहेत. सध्या ही सुविधा दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूरसह 10 शहरांतील 30 ठिकाणी उपलब्ध असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)