मुंबई : तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन अकाऊंट नसणारे सध्या फार क्वचितच सापडतील. हे ऑनलाईन अकाऊंट सुरु करण्यासाठी युझर्सना युझरनेम आणि पासवर्डची आवश्यकता असते. पण युझर्सना अनेक अकाऊंटचे पासवर्ड लक्षात ठेवणं कधी कधी फारच कठीण होतं. या अडचणीवर मात करण्यासाठी बहुतांश युझर विविध अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स सहजरित्या क्रॅक करु शकतात.

यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड '123456' असून तो सहजरित्या हॅक केला जाऊ शकतो. दुसऱ्या क्रमांकावर '123456789' हा पासवर्ड आहे. तर 'qwerty', '1111111' आणि 'password' हे देखील असुरक्षित पासवर्डच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. '123456' हा पासवर्ड वापरणाऱ्या युझरची संख्या सुमारे 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त आहे, जी इतर पासवर्डपेक्षा फारच पुढे आहे.

VIDEO | घे भरारी : हाय टेक : तुमचे इंटरनेटवरील पासवर्ड कसे सुरक्षित ठेवाल?


याशिवाय पासवर्डमध्ये ज्या नावांचा सर्वाधिक वापर होतो, त्यामध्ये 'Ashley', 'Michael', 'Daniel', 'Jessica' आणि 'Charlie' ही सर्वात कॉमन आहेत. हॅकर्स हे पासवर्ड कोणत्याही अडचणीशिवाय हॅक करु शकतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन यांसारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात.

जर तुम्हीही त्या लोकांपैकी आहात, जे या अशाप्रकारच्या पासवर्डद्वारे स्वत:चं अकाऊंट सुरक्षित समजत असाल तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. एनसीएससीच्या टेक्निकल डायरेक्टर डॉ इयान लेवी यांच्या माहितीनुसार, "जे लोक सर्वात कॉमन पासवर्डचा वापर करतात, ते हॅकिंगसाठी स्वत:ला सर्वात सोपं शिकार बनवतात." हॅक केलेल्या अकाऊंटच्या डेटाबेसची देखरेख करण्यासाठी सिक्युरिटी एक्सपर्ट ट्रॉय हंटच्या मते, "ऑनलाईन सिक्युरिटीचा एकमेव उपाय म्हणजे उत्तम पासवर्ड निवडणं."

सावधान! वेब ब्राऊजरमध्ये तुम्हीही पासवर्ड सेव्ह करताय?