WhatsApp : व्हॉट्सअॅपमध्ये  (WhatsApp)  नविन फिचर्स नेहमी अॅड होत असतात. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर तुम्ही या फिचर्सचा वापर करू शकता. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपची कंपनी ही लवकरच एक फिचर लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवे फिचर अँड्रोइड आणि iOS या दोघांसाठी देखील उपलब्ध असेल. सध्या या फिचरचा वापर अर्जेंटिनामधील काही युजर बीटा चाचणीसाठी करत आहेत. 


युजर 2GB पर्यंत साइज असणारी फाइल करू शकणार शेअर 


सोशल मीडिया अॅपचा वापर करून अनेक जण फाइल्स शेअर करतात. पण व्हॉट्सअॅप आणि जीमेल या अॅप्सचा वापर करून फाइल्स शेअर करताना फाइल्सच्या साइजची मर्यादा आहे. जीमेलमधून फाइल शेअर करताना ती फाइल 25MB पेक्षा जास्त नसावी, याची काळजी घ्यावी लागते. तर सध्या व्हॉट्अॅपवरून तुम्ही 100MB साइज पर्यंतची फाइल सेंड करू शकता. अशा वेळी अनेक लोक टेलिग्रामचा वापर करतात. कारण टेलिग्राम या अॅपला फाइल साइजची मर्यादा नाही. पण आता व्हाॉट्अॅपच्या या नव्या फिचरचा वापर करून तुम्ही 2GB पर्यंतची फाइल शेअर करू शकणार आहात. 


व्हॉट्सअॅप ट्रॅकर, WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या व्हॉट्सअॅपमधील अर्जेंटीना येथील काही बिटा टेस्टर्स या नव्या फिचरचा वापर करत आहे. आता हे नवे फिचर कधी लाँच होईल याची वाट व्हॉट्सअॅप युजर्स करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha